जि.प. उर्दू उच्चप्राथमिक शाळा देऊळगाव महिच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या नवनिर्वाचित पदाधिकऱ्यांचे स्वागत समारंभ संपन्न
देऊळगाव मही :- बुलढाणा किल्ह्यातील नामवंत शाळा जि.प. उर्दू उच्चप्राथमिक शाळा देऊळगाव मही शाळा व्यवस्थापन समिती दिनांक 24/09/2022 रोजी गठीत करण्यात आली होती. समितीमध्ये शेख अलीम उर्फ राजू भाई यांना अध्यक्ष पद मिळाले तर उपाध्यक्ष पदी शेख फरीद कुरेशी यांची नियुक्ती करण्यात आली व इतर सदस्यांच्या नियुक्त्या ही करण्यात आल्या. या अनुषंगाने आज दिनांक 27/09/2022 रोजी समिती चे नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे शाळेच्या सर्व शिक्षक वृंदाकळून स्वागत करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शेख जमीर रजा सर यांनी सूत्र संचालन केले. स्वागतानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष,उपाध्यक्ष व काही सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.रियाज अहेमद सर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.शिक्षक वृंदाकळून व शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांकळून शाळेचे मुख्याध्यापक शेख जमीर रजा सर यांचेही स्वागत करण्यात आले.
सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे मुज़फ्फर ज़ियाउल्लाह खान, शेख जुनैद अब्दुर्रऊफ कुरैशी, ज़ुल्फ़िकार ताहेर शेख,सईद हबीब सय्यद, सरफ़राज़ मुनीर शेख, ज़ुल्फ़िकार अब्दुस्सत्तार खान, अनीस हमीद शेख, हुसैन अब्दुलगफूर शेख तर शिक्षणतज्ञ समीर रज़ा शेख.यावेळी सर्व शिक्षकवृंद,विद्यार्थी समितीचे सर्व पदाधिकारी व गावातील काही मंडळी उपस्थित होते.