बुलडाणा दि.18 : गेल्या कित्येक दशकांपासुन भारताची ओळख असलेला योगाभ्यास आता आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या औचित्याने जगभरात अधिकृतरित्या मान्यता प्राप्त झालेला आहे. संयुक्त राष्ट्रांनी 21 जुन हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषीत केला आहे. त्या अनुषंगाने जिल्हास्तर आयोजन समितीच्या वतीने दि.17 जुन 2021 रोजी जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल येथे संजय सबनीस, जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे मार्गदर्शनानुसार किशोर पागोरे, उपशिक्षणाधिकारी, (माध्यमिक), आरोग्य भारतीचे डॉ.राजेश्वर उबरहंडे, क्रीडा भारतीचे सदानंद काणे, बाळ आयचित, रविंद्र गणेशे, भारत स्काऊट गाईडचे जिल्हा संघटक एस.पी.आठवले, आर्ट ऑफ लिव्हींगचे प्रशांत लहासे, योगांजली योगवर्ग योगविद्या धाम नाशिकच्या सौ.अंजली परांजपे, आयुष मंत्रालयाच्या डॉ.मंजु राजेजाधव, पी.आर.उपर्वट अध्यक्ष बुलडाणा जिल्हा योग असोसिएशन व तेजराव डहाके सचिव, बुलडाणा जिल्हा योग असोसिएशन, नेहरु युवा केंद्राचे धनंजय चाफेकर, एन.बी.धंदर, अनिल इंगळे राज्य क्रीडा मार्गदर्शक, रविंद्र धारपवार क्रीडा अधिकारी, विजय बोदडे यांचे उपस्थितीत सभा पार पडली.
सभेमध्ये जिल्ह्यामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर सर्व शालेय विद्यार्थी, युवक-युवती, नागरीकांमध्ये योग विषयक आवड निर्माण करणे तसेच योगाचा प्रसार व प्रचार करणे याकरीता आंतरराष्ट्रीय दिनाचे औचित्य साधुन दि.21 जुन 2021 रोजी सकाळी 7 ते 7.45 वाजेपर्यंत कोरोना-19 विषाणुचा प्रादुर्भाव पाहता गतवर्षीप्रमाणे यावर्षी ही ऑनलाईन पध्दतीने कोरोना नियमाचे पालन करुन आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे आयोजन करण्यात येत आहे. सदर उपक्रम अत्यंत चांगल्याप्रकारे राबविण्याकरीता तसेच सर्वात जास्त सहभाग घेण्याकरीता सामान्य योग प्रोटोकॉलवर आधारीत जिल्हा प्रशासन, शालेय शिक्षण विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षणाधिकारी माध्य./प्राथ. कार्यालय, आयुष मंत्रालय, जिल्हा योग संघटना, आरोग्य भारती, क्रीडा भारती, आर्ट ऑफ लिव्हींग, पतंजली योग समिती, नेहरु युवा केंद्र विविध क्रीडा मंडळे, महिला मंडळ, विविध एकविध खेळ संघटना, बुलडाणा जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना, आयुर्वेद महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय व योगक्षेत्रात विविध कार्यरत संस्था संयुक्त विद्यमाने युवक-युवती, योगाप्रेमी नागरीक, अधिकारी/कर्मचारी यांचे करीता आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन ऑनलाईन पध्दतीने करण्यात येत आहे.
त्यानुसार बुलडाणा जिल्ह्यातील, तालुक्यातील विविध शैक्षणिक संस्था / संघटना, शासकीय निमशासकीय कार्यालये, महाविद्यालये यांना ऑनलाईन पध्दतीने जास्तीत जास्त सहभागी होण्याकरीता आवाहन करण्यात येत आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा द्वारे योग दिनाचे औचित्य साधुन गुगल मिटद्वारे ऑनलाईन पध्दतीने दि.21 जुन 2021 रोजी सकाळी 7 ते 7.45 वा. आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येत आहे. त्याबाबतची गुगल मिट लिंक https://meet. google.com.ftx-xsnk-tbn तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणाचे फेसबुक पेज लाईव्ह सुध्दा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यानुसार या कार्याक्रमात जिल्ह्यातील नागरीक, युवक युवती, विद्यार्थी, खेळाडू, अधिकारी / कर्मचारी यांना सहभागी होता येईल.

तसेच महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, विद्यालय, क्रीडा मंडळे यांना त्यांचे स्तरावर ऑनलाईन योगदिन साजरा करणेबाबत गुगलमिट, झुम ॲप व इतर व्हर्च्युअल पध्दतीने जास्तीत जास्त ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात यावे. त्याअनुषंगाने बुजिल्ह्यातील सर्व शाळा / महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, क्रीडा मंडळे, महिला मंडळे, विविध शासकीय/निमशासकीय कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी योगप्रेमी नागरीक, खेळाडू यांनी दि.21 जुन 2021 रोजी सकाळी 7 ते 7.45 या वेळेत ऑनलाईन, आपआपल्या घरी सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन सामुहीक योग प्रात्यक्षीक करुन तसा उपस्थितीचा सविस्तर अहवाल, कार्यक्रमाचे फोटो, योगास्थळ, सहभागी संख्या, इत्यादी बाबतची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडा नगरी, जांभरुन रोड, बुलडाणा येथे सादर करावी असेही सभेमध्ये ठरले.
तसेच आंतरराष्ट्रीय योग दिनाचे प्रात्यक्षीक सकाळी 7 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलडाणा येथील हॉलमध्ये करण्यात येईल. या प्रात्यक्षीक कार्यक्रमासाठी सौ.अंचली परांजपे व प्रशांत लहासे व योगक्षेत्रात काम करणारे योगप्रेमी उपस्थित राहतील. तसेच प्रोजेक्टरवर लाईव्ह फेसबुक पेजद्वारे जास्तीत जास्त विद्यार्थी, खेळाडू, क्रीडाप्रेमी नागरीक, योग प्रेमी यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हास्तर आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले. तर या तांत्रीक बाबीसाठी कैलास डुडवा, विनोद गायकवाड, किरण लहाने, आयुर्वेद महाविद्यालयातील कर्मचारी हे काम पाहतील. या सभेकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते तर कृष्णा नरोटे, गणेश डोंगरदिवे यांनी प्रयत्न केले, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.