सिंदखेड राजा प्रतिनिधी – सिंदखेड राजा शहरातील सुख आणि दुःख या नावाने व्हाट्सअप ग्रुप अडमीन ने ग्रुपच्या सर्व सदस्यांना आव्हान केलं होतं की महापुरात कचाट्यात सापडलेली बांधवाची मदतीची गरज आहे त्याचा आव्हानाला प्रतिसाद ग्रुपच्या सर्व सदस्यांनी दिला व व्हाट्सअप च्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी 7605 रुपये जमा झाले .
जमा झालेले पैसे आज तहसीलदार सिंदखेड राजा यांच्यामार्फत कोल्हापूर जिल्हाधिकारी त्याचा खाते मध्ये डीडी स्वरूपात पाठवण्यात आले. यावेळी ग्रुप ॲडमिन अनंता कुरगळ, गौतम खरात ,बाळू म्हस्के, नरू तायडे ,तानाजी भोपळे .विनोद खरात, अमोल मूळे उपस्थित होते व युवकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासत जमवलेल्या निधीबद्दल परिसरात सर्व स्थरातून कौतुक होत आहे व सोशल मीडियाच्या माध्यमातुन केलेला संकल्प व त्याला सर्व सदस्यांनी दिलेली साथ याचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे .