बोडखा येथे पाण्याच्या टाकीच्या स्वच्छता श्रमदानातुन सरपंच उपसरपंच यांचा कर्तव्यदक्षपणा नागरिकां कडून कौतुक
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] – तालुक्यात बोडखा गावात ग्रा प ने गेल्या ६ वर्षा पुर्वी जल स्वराज्य योजने अंतर्गत बांधलेली पाण्याची टाकीची स्वच्छता गेल्या ३ वर्षा पुर्वी करण्यात आली परंतु सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अशुद्ध दुषित पाणी पिल्याने पोटा संबंधीत आजार होतात त्यामुळे पाण्या पासुन नागरिकांना रोगराई होऊ नये पिण्याचे शुध्द पाणी मिळावे म्हणुन कर्तव्यदक्ष सरपंच उदेभान उमाळे उपसरपंच साहेब खान पठाण गावातील प्रतिष्टीत नागरिक सुगदेव सावंत यांच्या पुढाकाराने पिण्याच्या पाणी टाकीतील घाण कचरा काढुन साफ सफाई युवकांच्या श्रमदानातुन करण्यात आली यावेळी पाणी पुरवठा कर्मचारी अतुल उमाळे ,ग्रामपंचायत कर्मचारी प्रल्हाद सोळे, राहुल उमाळे, गोपाल नेरकर, गोलू उमाळे, यांनी पिण्या पाण्याच्या टाकीची स्वच्छता केली तसेच ग्रा प मार्फत वॉल पाईप दुरुस्ती करण्यात आली नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येत असल्याने ग्रा प प्रशासनाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे