बुलडाणा, दि.16 : पाणीटंचाई निवारणार्थ दे. राजा तालुक्यातील 17, नांदुरा तालुक्यातील व मलकापूर तालुक्यातील 1, अशा एकूण 19 गावांसाठी 23 विंधन विहीरी मंजूर करण्यात आल्या आहेत. विंधन विहीरी घेण्यात आलेल्या गावांमध्ये ही कामे सुरू करण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यानंतर कामाचा पंचनामा कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांनी करावयाचा आहे.
विंधन विहीरी दे राजा तालुक्यातील सावंगी टेकाळे, वाकी खु, वाकी बु, किन्ही पवार, पिंपळगाव चीलमखा, शिवणी आरमाळ, सावखेड नागरे, पळसखेड झा., पळसखेड मकर्ध्वज, पिंपळगाव बू, नागनगाव, जुमडा, भिवगाव बू, दे. मही, निमखेड, पिंपरी आंधळे, गिरोली बू, नांदुरा तालुक्यातील धाडी व मलकापूर तालुक्यातील निमखेड गावांसाठी मंजूर करण्यात आलेल्या आहेत. यामुळे या गावांमधील पाणीटंचाई सुसह्य होण्यास निश्चितच मदत मिळणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.