बुलडाणा दि.18 : या वन परिक्षेत्रात 33 कोटी योजनेचा बट्टयाबोळ असल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. मात्र जळगांव जामोद व संग्रामपूर या दोन्ही तालुक्यातील एकूण लागवड करण्यात आलेल्या 2 लक्ष 61 हजार रोपांची माहे मे 2021 या तृतीय वर्षातील जीवंत रोपे सरासरी टक्केरी ही 80 टक्के पेक्षा अधिक आहे. या रोपांची माहिती छायाचित्र व चित्रफीतीसह mahaforest.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे दोन्ही तालुक्यातील वृक्ष लागवड ही बुलडाणा जिल्ह्यातील जिल्हा उपनिबंधक, मजूर कामगार सहकारी संस्था यांचेमार्फत काम वाटप करूनच नियमानुसारच करण्यात आले आहे. या वृक्षलागवडी संदर्भातील सर्व कामे वेळोवेळी त्यांचे मार्फत करून घेण्यात आलेली आहे. परिक्षेत्रातील 33 कोटी वृक्षलागवड यशस्वी असून कुठलाही गैरप्रकार सदर कार्यालयामार्फत झालेला नाही, असा खुलासा वनक्षेत्रपाल, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र, जळगाव जामोद यांनी केला आहे.