निलेश रामेकर रूईखेड मायंबा (माझा स्वतःचा अनुभव)- माझे मामा श्री गजानन पांडुरंग नारोटे रा देवपूर ता.जि. बुलडाणा यांना कोरोना झाला असता ते बुलडाणा येते खाजगी दवाखान्यात गेले. तेथे त्यांचा Reoprt positive आला. आणि स्कोर 3 चा होता. परंतु डॉक्टर यांनी गोळ्या औषधी देऊन घरीच आराम करायला सांगितले. 4 दिवसानंतर मामांचा त्रास वाढला. परत त्याच डॉक्टर साहेबांकडे गेल्यावर ct scan केले. तर score 13 चा झाला. त्यांनी icu मध्ये भरती करायला सांगितले. आणि भरती करण्या पूर्वीच 1 लाख रुपये खर्च लागेल असे सांगितले. पेशन्टची दुरुस्त होण्याची हामी घेतली नाही. एकतर आधी 2 वेळचा CT scan, औषधी, येण्या जाण्याचा खर्च, वेगवेगळ्या रक्त तपासण्या हा सर्व खर्च 20 हजार रुपयाच्या वर झाला होता. त्यात अजून 1 लाख खर्च होईल, आणि जिवाची गॅरंटी नाही. मी मामांच्या सोबतच असल्याने मी लगेच विवेकानंद आश्रम (हिवरा)चे उपाध्यक्ष अशोक भाऊ थोरहाते आणि सहसचिव आत्मानंदजी थोरहाते यांच्याशी संपर्क साधून विवेकानंद आश्रम कोविड सेंटरला मामांना घेऊन गेलो त्या ठिकाणी icu तसेच पुरेशे ऑक्सिजन उपलब्ध असून व्हेंटिलेटरची सुविधा होती. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सरकारने ठरवून दिलेल्या चार्ज पेक्षा 1000 रुपयाने कमी दराने पेशंट कडून बिल आकारण्यात येते. तसेच वेगवेगळ्या सर्व आवश्यक सुविधा पेशंट साठी आहेत. आश्रमाच्या वतीने पेशंटला 3 वेळची चहा, 1 वेळचा सकाळचा पौष्टिक नास्ता, 2 वेळेचे अतिशय चांगल्या दर्जाचे जेवण, एक वेळ हळदीचे छान दुध हे सर्व मोफत मिळते. तसेच पेशंटला सोडायला व घ्यायला येणाऱ्या सोबतच्या लोकांची सुद्धा मोफत चहा, नास्ता, जेवण व निवासाची वेगळी व्यवस्था आहे.
अतिशय छान, पवित्र, धार्मिक निसर्गरम्य वातावरण आहे. दिवसभर हाॅस्पिटल मधे असलेल्या साऊंड सिस्टिम वर छान भक्तिगीते, कीर्तने ऐकायला मिळतात. यामुळे पेशंटला एक वेगळाच मानसिक धीर मिळतो. त्याच बरोबर दररोज संध्याकाळी विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सहसचिव आवर्जुन भेट देऊन पाहणी करून लक्ष देतात. पेशंटची आत्मियतेने चौकशी करतात.
आमच्या ज्या पेशंटला बाहेर 1 लाख रुपये लागणार होते. विवेकानंद आश्रम कोवीड हाॅस्पिटल मधे आमचा पेशंट 5 दिवस अॅडमिट होता. 5 दिवसाचा हाॅस्पिटल चार्ज फक्त 15 हजार रुपये आकारण्यात आला. 5 दिवसाची तसेच पुढच्या 7 दिवसाची मेडिसिन, गाडी भाडे सह 33 हजार रुपये इतर खर्च लागला. असा कमी खर्चामधे आमचा पेशंट सुखरूप घरी आला आहे.
आज मला पूजनीय महाराजश्रींची आठवण झाली की खरच गोर गरिबांसाठी सुरू केलेला विवेकानंद आश्रम म्हणजे खरा मानव सेवा आश्रम आहे. आश्रमाची सेवेचे परंपरा कायम सुरूच आहे. आश्रमाच्या कोवीड हॉस्पीटलमधे प्रत्यक्ष भेट दिल्यानंतरच ह्या सर्व गोष्टी कळतात. दुःखात गेलेला पेशंट तिथून हसत हासत परत येतो.
विवेकानंद आश्रम सर्व ट्रस्टींची धन्यवाद. जय शुकदास माऊली जय विवेकानंद
निलेश रामेकर रूईखेड मायंबा