प्रतिनिधी मेहकर रवींद्र सुरुशे – प्रति पंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या देऊळगाव माळी तालुका मेहकर येथे विठ्ठल मंदिरामध्ये आज आषाढी एकादशी निमित्त पांडुरंग संस्थांचे अध्यक्ष टी. एल.मगर यांच्या हस्ते कोरोणा नियमांचे पालन करून महापूजा संपन्न झाली. दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात प्रतिपंढरपूर देऊळगाव माळी येथे आषाढी उत्सव साजरा होत असतो. जसा पंढरपूर येथे सोहळा पार पडत असतो अगदी तशाच प्रमाणे सोहळा साजरा होत असतो. जवळपास 200 हून अधिक दिंड्या या प्रती पंढरपूर मध्ये या सोहळ्यासाठी मोठ्या तन-मन-धनाने येत असतात. तसेच महाराष्ट्रातील सर्वात मोठी 200 किलो ची दहीहंडी सोहळा पार पाडला जातो परंतु यावर्षी कोरोना नियमाच्या अधीन राहून सर्व उत्सव बंद ठेवण्यात आले आहे. तरी भाविकांनी आपल्या घरूनच दर्शन घेण्याचे आवाहन पांडुरंग संस्थांच्या वतीने करण्यात आले आहेत.
Related Posts