रवींद्र सुरुशे – विवेकानंद नगर निष्काम कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजश्री यांनी ग्रामीण भागातील कष्टकरी शेतकरी बांधवांना ‘शेती सोबत जोडधंदा म्हणून दुध व्यवसायास सुरूवात करून आर्थिक उन्नती करावी’ यासाठी नेहमीच प्रेरीत केले. विवेकानंद आश्रमाने गेल्या अनेक वर्षांपासून श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवात गोपूजनाची परंपरा जोपासत गोसंवर्धनाचे महत्व समाजाला पटवून दिले आहे.
विवेकानंद आश्रमाची गोशाळा शासनाच्या कुठल्याही अनुदानाशिवाय सुरू आहे. या गोशाळेत १५० पेक्षा अधिक गायी आहेत. आज गोकुळष्टमी निमित्त आ.डॉ.संजयजी रायमूलकर यांच्या हस्ते गोशाळेत गो पूजन करण्यात आले. यावेळी विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, सहसचिव आत्मानंद थोरहाते, विश्वस्त पुरूषोत्तम आकोटकर, सामाजिक कार्यकर्ते नितीन इंगळे, भागवत महाराज भिसे, शिवदास सांबपूरे सर, माजी सरपंच अशोक लहाने, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल भाकडे, केशव शेळके, वसंतआप्पा सांबपुरे, बेलाप्पा धाडकर तथा आदि उपस्थित होते.