सिंदखेडराजा : वैष्णव गडावरील विठ्ठल रखमाई मंदिरात आषाढी एकादशीला अन्न औषध प्रशासन मंत्री तथा जिल्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे हे सपत्नीक महापूजा करणार आहेत.या संदर्भात मंदिर विश्र्वस्थानी डॉ.शिंगणे यांना रितसर निमंत्रण दिले असून पालकमंत्र्यांनी हे निमंत्रण स्वीकारून महापुजेला उपस्थित राहणार असल्याचे म्हंटले आहे.
सिंदखेडराजा तालुक्यातील पिंपळ खुटा शिवारात ,शहरापासून 7 किलोमीटर अंतरावर हरिभक्त परायण सानप गुरुजी यांच्या संकल्पनेतून वैष्णव गड साकारला आहे.पंढरपूर प्रमाणे श्री विट्ठलाचे सुबक मंदिर येथे निर्माण करण्यात आले आहे.लोकप्रतिनिधी आणि लोकसहभाग यातून कोट्यवधी रुपये खर्च करून हे मंदिर उभे राहिले असून येथे वर्षभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.शासनाच्या ब वर्ग दर्जा असलेल्या या मंदिर परिसराला या पुढील काळात अ वर्ग दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.दरम्यान,आषाढी एकादशीला पालकमंत्री यांच्या हस्ते महापूजा होणार असल्याने, सोमवारी येथे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली या बैठकीला गुरुवर्य सानप गुरुजी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍड नाझेर काजी यांच्यासह तहसीलदार सुनील सावंत, कृषी विभागाचे वसंत राठोड,वनविभाग,सामाजिक वनीकरण,वीज मंडळाचे अधिकारी,मंदिर विश्वस्त या बैठकीला उपस्थित होते.महापुजेच्या निमित्ताने सर्व शासकीय यंत्रणा कार्यरत असाव्या यासाठी सर्व अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून या पुढील काळात गड व मंदिर विकासासाठी 5 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे.