विवेकानंद आश्रम ला सुरक्षा सेवा संघ विदर्भ महिला अध्यक्ष राजश्री पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते नीलेश निकस यांनी भेट दिली.
मेहकर रवींद्र सूरूशे – :विवेकानंद आश्रम चे उपाध्यक्ष अशोक भाऊ थोरात उपस्थित होते विवेकानंद आश्रम मध्ये परमपूज्य शुक दास जी महाराज संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. विवेकानंद आश्रम ला सुरक्षा सेवा संघ विदर्भ महिला अध्यक्ष राजश्री पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते नीलेश निकस यांनी भेट दिली. अपंग मुलांसाठी असलेले निवासी विद्यालय कर्णबधिर मुलांसाठी असलेले निवासी विद्यालय विवेकानंद ज्ञानपीठ वर्ग 1 ते 12 विवेकानंद मराठी प्राथमिक शाळा विवेकानंद विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय तसेच सामुहिक भोजन करणारे विवेकानंद वस्तीगृहातील शारदामाता मुलींच्या वसतिगृहाला यांनी भेट दिली त्यानंतर वस्तीगृहाची भव्य इमारत व तीर्थाचे महाद्वार येथे सुद्धा भेट दिली.