अंजनी बु ता. मेहकर येथील शेतकरी पुरूषोत्तम अवचार यांचा समावेश
बुलडाणा दि.30 : रब्बी हंगाम 2020-21 मधील राज्यस्तरीय पीक स्पर्धांचे निकाल घोषित करण्यात आले आहेत. या विजेत्या शेतकऱ्यांमधून चार निवडक शेतकऱ्यांचा सत्कार 1 जुलै 2021 रोजी कृषी दिनी मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्याहस्ते मंत्रालय, मुंबई येथे करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक विभागातील रिसोर्स बँकेतील एक शेतकरी झूम प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत. या सर्व शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री ना उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील अंजनी बु ता. मेहकर येथील शेतकरी पुरूषोत्तम श्रीपत अवचार यांचा समावेश असणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण www.youtube.com/C/AgricultureDepartmentGoM या कृषी विभागाच्या युट्यूब चॅनेलवरून करण्यात येणार आहे.
कार्यक्रमासाठी तालुक्यातील दोन पिकांमध्ये उच्च उत्पादन घेणाऱ्या दोन शेतकरी व पीक स्पर्धा विजेते शेतकरी यांना विशेष उपस्थित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कृषी संजीवनी मोहीम समारोप आणि कृषी दिन कार्यक्रम गुरुवार,दिनांक 1 जुलै रोजी दू. 12.30 वाजता मंत्रालय, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे ऑनलाईन लाईव्ह प्रसारण, कृषी विभागाच्या www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM यूट्यूब चॅनलद्वारे करण्यात येणार आहे. तरी शेतकरी बांधवांनी वरील युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून कार्यक्रमाचे थेट प्रसारण पाहावे, असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.