जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त उमंग युथ फाऊंडेशनच्या वतीने पोलीस बांधवांना पुलावचे वाटप
उमंग युथ फाऊंडेशन, मातृतीर्थ सिंदखेडराजा नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत आलेले आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिजाऊ जन्मोत्सव २०२२ निमित्त त्यांनी एक आगळावेगळा उपक्रम राबविला. या उपक्रमात त्यांनी जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त बंदोबस्तावरती असलेल्या ८०० कर्तव्यदक्ष पोलीस बंधु-भगिनी साठी जवळजवळ अर्धा क्विंटल पुलावचे वाटप केले.
Covid-19च्या सर्व नियमांच्या चौकटीत राहून उमंग युथ फाऊंडेशनने हा उपक्रम अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडला. या उपक्रमासाठी उमंग युथ फाऊंडेशनच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यानी अत्यंत मेहनत घेतली.
येत्या काळात देखील उमंग युथ फाऊंडेशनतर्फे असेच अनेक समाजपयोगी उपक्रम राबविण्यात येतील.
उमंग युथ फाऊंडेशन, मातृतीर्थ सिंदखेडराजा