सिंदखेड राजा – सिंदखेड राजा शहरातील भालदारा शिवार मधील कट्टा मध्ये जिजामाता नगरीतील तीन महिला भाजीपाला जमा करून आनण्यासाठी गेले असता पाऊस प्रचंड पडत असल्यामुळे पावसाचा अंदाज आला नाही .घरी निघताना कट्ट्या मधून बाहेर पडत असताना पाण्यामध्ये वाहून गेल्या .त्यातील दोन महिला संगिता संतोष शिंगणे २९वर्ष व वनिता शिंगणे २५ वर्ष या दोघी सख्या बहिणी झाडाला धरून बाहेर पडल्या व त्यांची काकू मंगला गणेश शिंगणे या वाहून गेले आहेत. स्थानिक रहिवाशांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले पोलीस कर्मचारी व महसूल यांची टीम पण उपस्थित होती.
सदर महिला मंगला गणेश शिंगणे अद्यापी बेपत्ता आहे तिचा शोध घेतला असता ती सापडली नाही .सिदखेडराजा तहसीलदार सुनील सावंत , ठाणेदार केशव वाघ ,नगरसेवक गौतम खरात ,दीपक भालेराव यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन सकाळी लवकरच शोध मोहीम सुरू करणार असल्याचे सांगितले व आज सकाळी शोधमोहीम घेतली असता मंगला गणेश शिंगणे या मृतावस्थेत आढळून आल्या बातमी लिहीपर्यंत पुढील कारवाई सुरु होती.