डोणगाव : विश्वी येथील तूर लंपास करणाऱ्या तीन चोरट्यांना स्थानिक गुन्हे यांना ४ जुलै रोजी अटक केली.त्यांच्याकडून चोरी गेलेल्या तुरीसह १६ लाख ५ ९ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. विश्वी येथील गोदामातून ४७ क्विंटल तुर अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने करून योगेश गणेश राठोड, रामा जाधव, विलास गुलाब राठोड, राहणार विश्वी तालुका मेहकर यांना चार जुलै रोजी अटक केली. त्यांच्याकडून एक मालवाहू किंमत आठ लाख रुपये एक छोटे मालवाहू चार लाख रुपये तर साडे 42 क्विंटल तूर दोन लाख 63 हजार पाचशे रुपयाची. दोन मोबाईल वीस हजार रुपये किमतीचे, व गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकी किंमत एक लाख दहा हजार व रोख रक्कम एकूण 59500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Related Posts