किनगावराजा आनंद राजे (प्रतिनिधी) – येथून जवळच असलेल्या निमगाव वायाळ येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत यु.पी.एल.अॅडव्हान्स सिड्स कंपनीच्या वतीने वृक्ष लागवडीचा कार्यक्रम संपन्न झाला.
सद्य परिस्थिती मध्ये वृक्षतोड प्रचंड प्रमाणात होत असून त्यामुळे जागतिक तापमानात वाढ होत आहे. अशा वातावरणामुळे मनुष्य तसेच इतर प्राणिमात्रांवर विपरीत परिणाम करणारे अनियमित बदल होत आहेत.नैसर्गिक थंडपणा हरवत चाललेल्या या वातावरणाचा सर्वात जास्त धोका शेतकऱ्यांवर होत आहे.त्यामुळे सामाजिक उत्तरदायित्व स्वीकारून अॅडव्हान्स सिड्स कंपनीचे झोनल व्यवस्थापक राहुल अकुस्कर यांच्या मार्गदर्शनातून येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील परिसरात कंपनीचे कर्मचारी अनंता शिंदे,राजू सानप,सी.एस.आर.मार्फत डॉ.उदार यांनी अशोका, बदाम,पेरूची झाडे उपलब्ध करून शिक्षक गजानन वणवे यांच्या हस्ते वृक्षाची लागवड केली.यावेळी शालेय कर्मचारी तथा निमगाव वायाळ येथील ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ जायभाये,सुरेश हुसे,अनिल वायाळ गजानन निलख,वैभव वायाळ,देवानंद हुसे, यांच्यासह शेतकरी तसेच पालकवर्ग उपस्थित होता.