महसूल प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याकारणाने स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांनी केली अवैध रेती वाहतुकदारावर कारवाई…
गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधी :- जळगाव जामोद तालुक्यामध्ये एकामागून एक अवैध रेती तस्करांवर कारवाया होत असून स्थानिक महसूल प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे की कुंभकर्ण झोपेचे सोंग घेत आहे असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे जळगाव जामोद तालुक्यामध्ये दिनांक 10 डिसेंबर रोजी जळगाव जामोद पोलीसांनी विना रॉयल्टी अवैधरित्या रेतीची वाहतूक करताना एक ट्रॅक्टर पकडले ती घटना होत नाही तोच 11 डिसेंबर च्या रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांनी विना रॉयल्टी अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारे टिप्पर पकडले.
त्यामुळे जळगाव जामोद महसूल विभागावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहेत. येथील तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना ही अवैधरीत्या होत असलेली रेती वाहतूक दिसत नाही का? की यांनी झोपेचे सोंग घेतले आहे. जळगाव जामोद तालुक्यातील मानेगाव येथे दिनांक 11 डिसेंबर च्या रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहिती मिळाली की ग्राम मानेगाव फाटा येथे टिप्पर वाहनाने शासनाचा महसूल बुडवून रेतीची चोरटी वाहतूक करत आहेत अशा माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन माळी यांनी दोन पंच सोबत घेऊन मानेगाव फाटा गाठला असता एक निळ्या रंगाचे टिप्पर एम एच 28 बी बी 1938 हे सुसाट वेगात मानेगाव फाटा येथे येत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे हेडकॉन्स्टेबल गजानन माळी यांनी टिप्पर थांबविले व आरोपीला रॉयल्टीची मागणी केली असता रॉयल्टी मिळून आली नाही.
सदर आरोपी चे नाव राजीक खान अजिज खान वय 21 वर्ष राहणार रसलपुर तालुका जळगाव जामोद येथील असून सदर गाडीमध्ये दोन ब्रास रेती विना रॉयल्टी किंमत दहा हजार रुपये व टिप्पर एम एच 28 बी बी 1938 किंमत सहा लाख 50 हजार रुपये असा एकूण सहा लाख सात हजार रुपयाचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला व सदर आरोपीला टिप्पर सह जळगाव जामोद पोलीस स्टेशनला नेऊन सदर आरोपी राजीक खान अजिज खान यांच्या विरोधात अप.नं 963/2021 कलम 379 भारतीय दंड विधान सह कलम 50/177मोवाका नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.