नागपूर – महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडी भिवापूर तालुका व शासकीय आयुर्वेदिक दवाखाना शिवापूर, रॅम्बो ब्लड बँक नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा प्रदेशाध्यक्ष तथा वर्धा जिह्याचे लोकप्रिय खासदार मा. रामदासजि तडस साहेब, विदर्भाचे प्रभारी बळवंतराव मोरघडे यांच्या मार्गदर्शनाने व युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष मा. आ. संदीपभैया क्षीरसागर, प्रदेश उपाध्यक्ष जगदीश वैद्य, प्रदेश सचिव संकेत बावनकुळे, नागपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष प्रशांत इखार यांच्या नेतृत्वात भिवापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील शासकीय आयुर्वेदिक दवाखाना, शिवापूर येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. डाखरे सर उपविभागीय कृषी अधिकारी, डॉ शेंडे मॅडम वैद्यकीय अधिकारी, प्रदेश उपाध्यक्ष जगदीश वैद्य, जिल्हाध्यक्ष प्रशांत इखार, ग्रामपंचायत सचिव गणेश राऊत सर, डॉ. भांगे, भिवापूर तालुका केंद्रप्रमुख हरिश्चंद्र दहाघाणे, संजयराव घुघुसकर, भिवापूर तालुका अध्यक्ष सुधाकर पडोळे, युवा मित्र गौरव वरघे, संघटन सचिव रामेश्वर गंधरे इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.
सर्वप्रथम संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विधिवत सुरूवात करण्यात आली अनेक मान्यवरांनी आज राज्यात होत असलेला रक्ताचा तुटवडा पाहून रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले व ग्रामीण भागातील जनतेला रक्तदान करून अनेकांना जीवदान मिळेल त्यामुळे आपण रक्तदान करण्याचे आवाहन केले ,रक्तदान शिबिरात ग्रामीण भागातील अनेक नागरिकांनी सहभाग नोंदवून कोरोणाच्या काळात अतिशय मोलाचे सहकार्य केले. या रक्तदान शिबिरात ३२ एवढ्या रक्तदात्यांनी सहकार्य केले रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे या ब्रीद वाक्याप्रमाणे ग्रामीणमधील नागरिकांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे संचालन अध्यक्ष सुधाकर पडोळे यांनी केले तर आभार गणेश राऊत यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ग्रामपंचायत तसेच, हॉस्पिटलमधील अनेक कर्मचार्यांनी सहकार्य केले.