प्रतिनिधी सिंदखेड राजा – कोरोना या महामारीमुळे रक्ताचा खूप तुटवडा आहे हे लक्षात घेता टायगर ग्रुप बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष अमोल राठोड यांच्या नेतृत्वात सिंदखेड राजा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ,या शिबिरामध्ये २८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

झाडे लावणे ही काळाजी गरज असून फक्त झाडे लावून न राहता त्याचे संगोपन करणे खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे टायगर ग्रुप बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने श्री क्षेत्र वैष्णव गड येथे २६ वृक्ष लागवड करून त्याची ३ वर्ष संगोपनाची जबाबदारी टायगर ग्रुप ने घेतली आहे
जिल्हयात चिखली,साखरखेर्डा, शेंदुर्जन, सुलतानपूर,पांगरी काटे,देऊळगाव मही , राजनी अश्या विविध, ठिकाणी गोर गरिबांना ४० किराणा किट व मास्क आणि सॅनिटायझर वाटप करण्यात आले
यावेळी टायगर ग्रुप बुलढाणा जिल्हा अध्यक्ष अमोल राठोड,जिल्हाउपाध्यक्ष दिपक खजुरे, टायगर ग्रुप लोणार सुरज साठे ,टायगर ग्रुप चिखलीचे जयेश काळे,पवन मेहेत्रे ,टायगर ग्रुप शेंदुर्जन वैभव डवके,बळीराम वडूळे,टायगर ग्रुप साखरखेर्डा विश्वजित इंगळे,मयूर खरात, योगेश पवार, आकाश आठवले,सचिन भुतेकर,प्रवीण पाईकराव,प्रताप गवई,अक्षय जाधव,टायगर ग्रुप देऊळगाव महिचे अभय शिंगणे,निखिल सरोदे,अभिजित खरात,शरद मांन्टे, राहुल राठोड,दिक्षय चव्हाण,वैभव भुतेकर,विजय सानप आदी टायगर ग्रुप सदस्य उपस्थित होते..