बुलडाणा दि. 23: केंद्र शासनाच्या युवक कल्याण योजनेअंतर्गत तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार सन 2020 करीता नामांकनाचे प्रस्ताव दि. 30 जुन 2021 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलडाणा येथे दोन प्रतीत कायार्लयीन वेळेत सादर करावे एक प्रत dsob ld@gmail.com या मेल वर पाठवावी. सदर पुरस्कारासाठी नामांकणाचे प्रस्ताव सादर करणाऱ्या खेळाडूंची कामगिरी 2018, 2019,2020 तीन वर्षामधील उत्कृट कामगिरी असावी, साहसी उपक्रम हे जमिन, पाणी व हवेमधील असणे आवश्यक आहे. खेळाडूंची कामगिरी अतिउत्कृष्ठ असणे आवश्यक आहे. त्याबाबतची माहिती दोन ते तिन पानामध्ये हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये प्रस्तावासोबत सादर करावी.

तसेच जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार सन 2020 करीता नामांकनाचे प्रस्तावा सोबत आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्रे, कात्रणे इत्यादी सोबत जोडणे आवश्यक राहील असे जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस,यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.