टेम्भूर्णी (प्रतिनिधी ) – टेम्भूर्णी ता जाफ्राबाद जि जालना येथील नवभारत कनिष्ठ, महाविद्यालयाची विध्यार्थिनी शिवानी विजय साबळे हि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वक्तृत्व स्पर्धेत राज्यात द्वितीय आली आहे . पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वक्तृत्व स्पर्धेचे नासिक येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशीय संशोधन संस्था यांनी आयोजन केले होते. ही स्पर्धा ऑनलाईन व्हिडीओ पाठवून आयोजित करण्यात आली होती . दिनांक 31 मे रोजी ही स्पर्धा झाली. त्या स्पर्धेत शिवानीने दुसरा क्रमांक पटकावला .

ह्या स्पर्धेत प्रमाणपत्र, बक्षीस, तसेच, इंदोर, व महेश्वर मध्य प्रदेश, येथे सहलीच्या माध्यमातून नेणार आहे. शिवानी विजय साबळे ने अनेक स्पर्धेत बक्षीस मिळविले असून राज्य लेव्हलवर दुसरा क्रमांक मिळवून मानाचा तुरा खोवला आहे, या स्पर्धेसाठी तिला संचालक तथा प्रा दत्ता देशमुख, प्रा बनसोडे सर, यांनी मार्गदर्शन केले, ह्या मुलीचे संस्थेचे जि. के काबरा, राम नारायण काबरा, राजीव काबरा,अध्यक्ष संजय काबरा, संस्थेचे सचिव प्रल्हाद टेम्भूर्णिकर, उपाध्यक्ष शेख जमीर सर, माजी अध्यक्ष सुरेश शेठ काबरा, माजी सचिव प्रेमसूख काबरा, संचालक निकम सर, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक बुकदाणे सर, जेष्ठ शिक्षक आढावे सर, प्रा यादमाळ सर, प्रा झटे सर, प्रा आहेर सर,प्रा . शेवाळे सर , प्रा भांगे सर, प्रा जाधव के. जि., प्रा डॉ. आनंद जाधव, धोटे सर, संवसाक्के सर, दिनकर उखार्डे, ससाणे सर, रिंढे सर,तसेच सर्व शिक्षक, कर्मचारी, यांनी अभिनंदन केले आहे. या विध्यार्थिनीचे परिसरात कौतुक होत आहे.