बुलढाणा – दिनांक 14 जून 2022 ला शिक्षणाधिकारी कार्यालयातून प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले. त्या प्रसिद्धिपत्रकात जिल्ह्यातील संगणक टंकलेखन (GCC – TBC) लघुलेखन प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच पालकांना कळविण्यात आले की वरील प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेला शासनाच्या माध्यमिक विभागाकडून मान्यता देण्यात आलेल्या आहे . तसेच या परीक्षा महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांचेकडून घेतल्या जातात प्रवेश घेण्यापूर्वी प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेकडे हि प्रमाणपत्र आहे किंवा नाही याची खात्री करूनच प्रवेश घेण्यात यावे .जिल्ह्यात मान्यताप्राप्त संस्थेची यादी mscepune.in या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेली आहे. संस्थेच्या विद्यार्थ्यांची परीक्षा त्यात जिल्ह्यात घेतली जाते जिल्ह्यात काही अवैध्य अवैधरित्या प्रवेश देऊन पालकांची व विद्यार्थ्यांची अशा अवैध संस्थेकडून दिशाभूल केल्या जात असल्याची संबंधित संस्थाचालकांच्या संघटनेने आमच्या निदर्शनास आणले आहे अशा संस्था आढळल्यास त्यांच्याविरुद्ध नियमाप्रमाणे कठोर कार्यवाही करण्यात येईल असे प्रसिद्धीपत्रकात माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक श्री प्रकाश मुकुंद जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या तर्फे प्रसिद्ध करण्यात आले
Related Posts