गजानन सोनटक्के जळगाव जा
जळगाव जामोद तालुक्यातील वन परिक्षेत्रातील तरोडा बुद्रुक येथील शेत शिवारामध्ये काही हरिण काळवीट मृतावस्थेत पडलेली असल्याची माहिती जळगाव जामोद वनपरिक्षेत्र अधिकारी यांना मिळाल्यावरून आज सकाळी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तेथे ६ काळवीट मादी व ४ नर जातीचे हरीण मृतावस्थेत आढळून आले. शेगाव, जळगाव जामोद या तालुक्यात हरिणांचा वावर असून या तालुक्यांमध्ये जंगल (बंदी) असल्याने प्राण्यांची संख्या जास्त आहे. यामुळे या परिसरात शिकाऱ्यांचाही वावर आहे. यामध्ये शनिवारी जळगाव जामोद वनपरिक्षेत्रातील हरणांचे मृतदेह पडून असल्याचे समजताच वनपरिक्षेत्र कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून पाहणी केली असता सदर शिवारातून ६ काळवीट मादी जातीचे आणि ४ नर जातीचे हरिण मृतावस्थेत मिळून आले. सदर प्राण्यांचे शव गोळा करून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. यावेळी सदर हरणांचा शवविच्छेदन करण्यात आले आहे. सदर प्राण्यांचे पोस्टमार्टम केल्यानंतर शरीराचे भाग गोळा करून सदर नमुने सीलबंद करून न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली..हरिणांचा मृत्यू कुठल्या कारणाने झाला याचा शोध घेतल्या जात आहे. हरिणांवर विष प्रयोग करण्यात आलेला असून सदर घटनेला स्थानिक वनपाल दंडे जबाबदार असून त्याचे विरोधात कारवाई व्हावी अशी मागणी शिवसेनेचे नेते गजानन वाघ यांनी केली आहे.