Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

किती पितळी तांबे अजूनही झाकलेली आहे ?

२०१४ पासून एक ट्रेंड चालू आहे आधी भ्रष्टाचारावर वारे माप आरोप करून निवडणूक सभा जिंकायच्या नंतर ज्यांच्यावर आरोप केले त्यांना आपल्या पक्षात सामावून घ्यायचे मग यांच्या पक्षातील वॉशिंगमशीन मध्ये धुवून काढले की तो नेता स्वच्छ झाला .
अमोल भट
९९७०७४४५५४

tambe


ज्यांचे भारतीय स्वतंत्र संग्रामात योगदान शून्य तेच प्रखर राष्ट्रभक्तीच्या बाता मारणार , जे बोलणार नेमकं त्याचे उलटी क्रिया करणार , जुने व्हिडिओ, पोस्ट असतात म्हणून तरी सामान्यपणे शोधले तरी घरी बसून यांची बनवेगिरी लक्षात येते . राजकारण हे युद्धाप्रमाणेच जिंकण्यासाठी असते पण महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या इतिहासात वैयक्तिकद विषयावर विरोधकास नमोहरण करण्याचे ठळकपणे आठवावे असे झाले नाही . तेव्हाचे विरोधी पक्षाचे म्हणजेच आताचे भाजपचे जुने नेतेमंडळी विरोधात असूनही अनेक शैक्षणिक संस्था कारखाने उघडून बसले तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांनी राजकारण निवडणूक प्रचारात करायचे बाकी राजकारणाच्या पलीकडे संबंध जोपासले जायचे .

आता भ्रष्ट राजकारणीच आपल्या पक्षात प्रवेश देऊन निरउत्तर झाल्यावर घराणे शाहीवर आरोप करायचे . या आरोपातही स्वपक्षीय घराणेशाहीवर डोळे मिटून घ्यायचे निवडून येणारे प्रबळ उमेदवार मग ते भ्रष्टाचारी असो घराणेशाही असो ते आपल्या पक्षात घेऊन त्या नेत्याच्या वैयक्तिक प्रभावामुळे निवडणूक जिंकला की आमच्या पक्षाची धोरण, आमचे नेतृत्व, आमचे काम यावर जनतेने विश्वास दाखवला अशा गर्जना करून आपलीच पाठ थोपटून घ्यायची .


काल-परवा नाशिकच्या विधान परिषद निवडणूक मधील सगळा गोंधळ करून ठेवणारी प्रवृत्ती नक्कीच अनाजी पंतांची वारसदार तर नाही ना ? अशी शंका येते या निवडणुकीच्या माध्यमातून काही घटना आठवतात पद्मसिंह पाटील व त्यांचे पुत्र राणा जगजितसिंग पाटील ,विजयसिंह पाटील व त्यांचे पुत्र रणजीत सिंग पाटील मोहिते ,मधुकर पिचड व त्यांचे पुत्र वैभव पिचड ,राधाकृष्ण विखे पाटील व त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील ह्या काही पिता-पुत्रांच्या लिस्ट यात राधाकृष्ण विखे पाटलांचा तसा संबंध घराणेशाही शी येतो पण त्यांचा पूर्व इतिहास हा सत्येकडून पक्षांतराचाच राहिलेला आहे जसे नाशिक पदवीधर मतदारसंघात तांबे पिता पुत्रामुळे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची पंचायत झाली त्यावरून हे तिन्ही उदाहरण आठवले .


पक्षांतर होणे आणि मातब्बर नेते मंडळी फोडणे हे 2014 नंतर अतिरेकी प्रमाणात वाढलेले आहे व या सर्व फोडाफोडीचा कर्ताधर्ता एकच समोर येतो आणि यावर महाराष्ट्रातील सामान्य जनतेस विचारले तरी लोक म्हणतात फड२० यांनी महाराष्ट्रातील राजकारणाचा पार चिखल करून खेळखंडोबा मांडला विधानपरिषद उमेदवारीचा महाविकास आघाडीचा घोळ न संपल्यामुळे भाजपचे उमेदवार निवडून येण्यास मदतच करणार का ?
राहुल गांधी , शरद पवार हे वैचारिक लढाईसाठी लढत असतील पण त्यांचेच कित्येक शिलेदार सत्तेसाठी भाजपच्या दावणीला स्वतःहून बांधून घेण्यास तयार आहे. शिस्तप्रिय म्हणवणारा पक्षही आपल्या पक्षातील निष्ठावंत यांच्या संधी डावलून अशा नेत्यांना पायघड्या घालून आपल्या पक्षात घेण्यास आसुसलेला आहे अजून किती तांब्यांचे पितळ उघड होणार हे येणारा काळ दाखवणारच जोपर्यंत बेगडी नेते पूर्णपणे जाऊन विचारांची शक्ती तयार होत नाही तोपर्यंत उसना विजय मिळवून काळी टोपी घालून आनंद उत्सव साजरा होतच राहणार.

Leave A Reply

Your email address will not be published.