तढेगाव,निमगाव घाटात पोकलेनच्या साहयाने वाळू उपसा,नागरिकानी आमरण उपोषण मांडत दाखवल्या उणिवा . महसूल प्रशासनच्या कार्यवाही कडे लक्ष ?
सिंदखेडराजा ( सचिन मांटे ) – सिंदखेडराजा तालुक्यातील मागील काही महिन्यात रेती घाटाचे लिलाव झाले पण तढेगाव,निमगाव,या घाटात मोठ्या प्रमाणात क्षमतेच्यावर वाळू उपसा झाला आहे पाण्याचे कारण दाखवून नदीपात्रातुन पोकलेनच्या साहयाने वाळू उपसा सुरु आहे,तढेगावं व निमगाव वायाळ या घाटात खूप दिवसापासून पोकलेनच्या सह्याने वाळू उपसा सुरु आहे,याउलट रेती घाटात पोकलेनला परवानगी फक्त रस्ता करण्यासाठी व व अडकलेली वाहने ढकलण्यासाठी आहे
पण याउलट याचा उपयोग वाळू उपसा करण्यासाठी व टिप्पर भरून दिल्यासाठी केला जातो सध्या हा विषय सर्व पंचक्रोशीत चर्चेचा बनला आहे,तढेगाव येथील मनोहर आंधळे,राहेरी येथील नारायण घुगे यांनी आपली प्रतिक्रिया मातृतीर्थ लाईव्ह देताना या घाटातून अवैद्यरित्या वाळू उपसा केला जात आहे याव्यतिरिक्त मर्यादापेक्षा जास्त वाळूचा उचल करण्यात आला आहे,अश्या ठेकेदाराविरोधात तहसील समोरच उत्तम राजमाने,अतुल भुसारी,विश्वनाथ भुसारी,देवानंद सपकाळ यांनी आमरण उपोषण करत आपल्या मागण्या मांडल्या आहेत,
निमगाव,तढेगाव,या घाटाची शासन मोजणी करून अहवाल सादर करून दोषी कर्मचारी यांचे निलंबन करावे अशी. मागणी उपोषण कर्त्यानी केली आहे,तढेगाव,निमगाव घाटात पोकलेन च्या साहायाने वाळू उपसा सुरु आहे हा आसपासच्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय झाला आहे या कडे महसूल प्रशासन व संबंधित अधिकारी कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित केला जातं आहे?