मोदी सरकार च्या डिझेल, पेट्रोल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ जळगाव जा येथील काँग्रेस कार्यकर्त्यांचे मुंडन
गजानन सोनटक्के जळगाव जा – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटी ह्यांच्या सूचने नुसार जळगांव जामोद शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज दिनांक ७/०६/२०२१, सोमवार रोजी, सकाळी 11 वाजता संपूर्ण राज्यात एकाच वेळी होत असलेल्या डिझेल,पेट्रोल व गॅस दरवाढ निषेध आंदोलनात जळगांव जामोद शहर व तालुका काँग्रेस कमिटीने सहभाग नोंदवला. जळगांव जामोद शहर व तालुका काँग्रेस कमिटी आयोजित डिझेल, पेट्रोल व गॅस दरवाढ विरोधात पदाधिकारी व कार्यकर्ते ह्यांनी एकत्र येत स्थानिक मुंदडा पेट्रोल पंप येथे नगर सेवक श्रीकृष्ण केदार व शेतकरी समाधान नानकदे यांनी प्रथम केंद्र सरकारच्या विरोधात मुंडन करून व पेट्रोल व डिझेल ग्राहकांना गुलाबाची फुले व पेढा भरवत त्यांना अच्छे दिन ची आठवण देत जनता सहन करत असलेल्या अन्यायाची जाणीव करून देत केंद्रातील भाजपा सरकार चा जाहीर निषेध व्यक्त केला.
यापुढे पक्ष आदेशानुसार तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून त्रासलेल्या जनतेला न्याय देण्याचे काम काँग्रेस चे पदाधिकारी करतील असा निर्धार करण्यात आला.यावेळी पक्षनेत्या डॉ. सौ. स्वातीताई वाकेकर,तालुका अध्यक्ष अविनाश उमरकर,शहर अध्यक्ष अर्जुन घोलप,बु जि काँग्रेस सरचिटणीस अमर पाचपोर,तालुका उपाध्यक्ष प्रमोद पाटील, शुभमभाऊ पाटील,नगर सेवक श्रीकृष्ण केदार, ऍड संदीप मानकर,nsui तालुका अध्यक्ष गोपाल कोथळकर,गौरव इंगळे,जामोद ग्रामपंचायत सदस्य वसंत धुर्डे,किसना दामधर,प्रविण भोपळे,युवक तालुका अध्यक्ष निशिकांत देशमुख,युवक शहर अध्यक्ष राजीक भाई, दादाराव धंदर, दिपक बंबटकार,महेंद्र बोडखे ,धनंजय बंबटकर,अनिल इंगळे,योगेश घोपे,ज्ञानेश वानखडे, संकेत रहाटे
यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होऊन आंदोलन यशस्वी पार पडले.