Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

खा. सुप्रिया सुळेंचा दौरा मुख्यमंत्री कन्नमवारांची आठवण देऊन गेला … मातृतीर्थाच्या आशा पल्लवित !

सिंदखेड राजा – राजमाता जिजाऊ मासाहेब यांचे जन्मस्थळ मातृतिर्थ सिंदखेड राजा जगामध्ये प्रसिद्ध आहे परंतु या सिंदखेड राजा चा आणि येथील असलेल्या ऐतिहासिक स्थळांचा आजपर्यंत पाहिजे तसा विकास व त्यास प्रसिद्धी मिळाली नाही . राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया ताई सुळे यांचा आजचा सिंदखेडराजा दौरा व या दौऱ्यामध्ये ऐतिहासिक स्थळांचा जीर्णोद्धार होण्यास मोठी मदत होणार आहे त्यामुळे त्या अनुषंगाने येथील विकासासाठी सुप्रियाताईंनी वेगवेगळ्या ऐतिहासिक स्थळांना आज भेटी दिल्या त्यात मोती तलाव ,चांदणी तलाव, काळा कोट, रंग महाल, राजे लखोजीराव जाधव यांची समाधी, रामेश्वर मंदिर, रेणुका माता मंदिर ,निळकंठेश्वर मंदिर ,बारव ,जिजामाता जन्मस्थान ,सावकार वाडा ,पुतळा बारव ,या सर्व ऐतिहासिक स्थळांना खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली व ही भेट नुसती धावती भेट न देता प्रत्येक स्थळाचा बारकाईने माहिती घेऊन काही नोंदी सुद्धा घेतल्या .

SUPRIYA SULE

वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना तेथील कार्यासंबंधी , जीर्णोद्धार संबंधी, अपूर्ण कामासंबंधी सूचना केल्या सुप्रिया सुळे यांच्या या दौऱ्यामुळे मातृतिर्थ सिंदखेड राजा व बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सिंदखेड राजा येथील विकास आराखडा संदर्भामध्ये जिल्हा नियोजन समितीत चर्चा होऊन विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली त्यानंतर 2016 मध्ये विकास कामांना शासनाकडून निधी मंजूर झाला परंतु अद्यापही विकास आराखड्यासंदर्भात इथली कामे पूर्णत्वास गेली नाही काही विकास कामाचा निधी मंजूर झालेला नाही त्यामुळे मंजूर झालेली कामे कोणत्या कारणामुळे पूर्ण झाली नाही व अपूर्ण निधी ,वाढवून निधी व येणाऱ्या विकास कामासंदर्भात अश्या अनेक बाबी या सुद्धा या दौऱ्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी समजून घेतल्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे ,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अँड नाझेर काझी , लखुजी राजे जाधव यांचे सोळावे वंशज शिवाजी राजे जाधव यांच्यासह पदाधिकारी व प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.

शहरातील या सर्व ऐतिहासिक स्मारकांचा जतन व संवर्धनाच्या संदर्भात राज्य व केंद्रीय पुरातत्व विभागाची संपर्क साधून योग्य तो मार्ग व पुढील कारवाई करण्याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले त्यामुळे जिल्हा वासियांच्या व मातृतिर्थ सिंदखेड राजा नगरवासी यांच्या विकास आराखड्यासंदर्भात व सिंदखेड राजा च्या विकासासंदर्भात आशा पल्लवित झाल्या व आजच्या दौऱ्यामुळे परत एकदा सिंदखेड राजा मध्ये माजी मुख्यमंत्री कन्नमवार यांची आठवण आली सुप्रिया ताईंच्या दौऱ्यास सारखेच यांनीसुद्धा सिंदखेड राजा च्या सर्व ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या होत्या जन्मस्थळ जन्मस्थळाचा भेटी देणारे सर्वच नेते पदाधिकारी येतात व भेट देतात पण सिंदखेड राजा येथील या सर्व ऐतिहासिक स्थळांना भेटी देणाऱ्या काही मोजक्याच पुढार्‍यांना पैकी सुप्रिया सुळे या होय.

Leave A Reply

Your email address will not be published.