सुनगांवात छुप्या मार्गाने हातभट्टी व देशी दारू विक्री सुरूच
राज्य उत्पादन शुल्काची कारवाई
सुनगाव येथील कारवाई नगण्य
सूनगावात देशी दारू सह हातभट्टीची दारू सर्रास विकल्या जात असून, या दारूमुळे मोठ्यांसह लहान मुले ही दारू प्यायला लागल्याचे चित्र सध्या दिसत आहे. गावातील शाळांच्या परिसरामध्ये अवैध स्वरूपात हातभट्टी देशी दारू यासह विविध ब्रँडच्या दारू मिळत असल्यामुळे या ठिकाणाहून नेहमीच दारू पिणाऱ्यांची वर्दळ सुरू असते. त्यामुळे शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनावरही दारू विषयी आकर्षण निर्माण होत आहे. त्यामुळे त्यांच्यावरही विपरीत परिणाम होऊन विद्यार्थी दशेतील मुलांना दारूची सवय लागली आहे. तसेच गावामध्ये अवैधरित्या दारू विकणाऱ्यांची संख्या वाढली असून कित्येकांचे संसार दारूमुळे उध्वस्त होत आहेत. असेच बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ खुलेआम दारू विक्री वाढली होती याला त्रस्त होऊन येथील महिला व पुरुष यांनी आक्रमक होऊन गेल्या दि 3 शनिवार दिवशी पोलिसस्टेशन गाठले व निवेदन देऊन दारू बंदीची मागणी केली त्यामुळे पोलीस प्रशासनाने सतर्क होऊन सूनगावातील दारूबंदी केली परंतु हे दारूबंदी दोन तीन दिवस राहिल्या नंतर सनगाव येथे खुलेआम देशी दारू व हातभट्टीची दारू छुप्या मार्गाने विक्री होत आहे अश्या बातम्या प्रसिद्ध होताच आज दिनांक 22 डिसेंबर रोजी माननीय विभागीय उप आयुक्त विजय चिंचाळकर साहेब अमरावती माननीय राज्य उत्पादन शुल्क बुलढाणा श्रीमती भाग्यश्री जाधव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सरते वर्ष 31 डिसेंबर ते अनुषंगाने मोजे सुनगाव तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा सूनगाव जामोद शिवारात जाऊन दारूबंदी गुन्ह्याकामी छापे टाकून चार आरोपी इसम महिलांना अनुक्रमे एक सुमित्राबाई ठाकूर राधाबाई बोबडे राहणार सुनगाव तसेच आबेदाबी शेख रईस मनसरखा रशीद का राहणार जामोद यांचे ताब्यातून 3155 रसायन लिटर मोह सडवा 180 लिटर गावठी हातभट्टी दारू तसेच सूनगाव येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री असताना केवळ 6.84 लिटर देशी दारू सापडणे अशी कारवाई नगण्य स्वरूपाची आहे अशा एकूण 95. 735 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात येऊन त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलमानुसार गुन्हे नोंद करण्यात आले सदर कार्यवाहीत आर के पुसे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क खामगाव तसेच श्री एन के मावळे दुय्यम निरीक्षक शेगाव जवान सर्वश्री प्रदीप देशमुख गणेश मोरे अमोल सुसरे मोहन जाधव जवान वाहन चालक एम आर एडारकर यांचे पथकाने कार्यवाही केली पुढील तपास श्री आर के फुसे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क खामगाव तसेच एन के मावळे दुय्यम निरीक्षक शेगाव हे करीत आहे