मेहकर ( रवींद्र सुरूशे ) :- मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा या गावातील 27 वर्षीय युवक पुण्याला काम करत
होता परंतु लॉक डाऊन मुळे घरी आला होता या 27 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 14 जून रोजी देऊळगाव
साकर्शा येथे उघडकीस आली. या घटनेची फिर्याद शहाजी शामराव पवार वय 41 यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार देऊळगाव साखरशा येथील
शेतामध्ये गोविंदा अनिल पवार हा युवक वय 27 वर्ष हा रात्री शेतामध्ये झोपण्यास गेला होता. शहाजी पवार हे सकाळी शेतामध्ये गेले असता त्यांना गोविंदा अनिल पवार लटकलेल्या अवस्थेत आढळून आला गोविंदा पुण्याला काम करत होता परंतु लॉक डाऊन मुळे घरी आला होता. पोलिसांनी पंचनामा करून मर्ग दाखल केला आहे .

पुढील तपास ठाणेदार राहुल गोंदे यांच्यामार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रल्हाद टकले, विनोद फुफाटे सह ड्रायव्हर गाभणे करत आहेत.