रवींद्र सुरुशे मेहकर – प्राथमिक आरोग्य केंद्र देऊळगाव माळी तालुका मेहकर अंतर्गत येणारे ग्राम सुभानपूर येथे गावातील सर्व नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यात आले असून मेहकर तालुक्यातील 100% लसीकरण झालेले पहिले गाव म्हणून बहुमान प्राप्त झाला आहे. गावातील सर्व नागरिकांनी या लसीकरण मोहिमेला प्रतिसाद दिला. या लसीकरण मोहिमेमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्लवी मगर, आरोग्य सेविका रूपाली तांबेकर, शिक्षिका शालिनी मगर, आशा गटप्रवर्तक शिराळे, अंगणवाडी सेविका सुरेखा काळे, आशा सेविका सुनिता लोंढे, अनुसया भराड, नितेश राठोड, माजी सरपंच विजय काळे, आरोग्य सहाय्यक जगताप, आदींनी गाव 100% लसीकरण करून घेण्यासाठी प्रयत्न केले. यामुळे गावकर्यां सह संपूर्ण वैद्यकीय टीमचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
प्रत्येक गावातील सरपंच, समाजसेवी यांनी पुढाकार घेऊन आपले गाव 100% लसीकरण व्हावे यासाठी प्रयत्न करावे. तसेच लस घेतल्यानंतर सुद्धा सोशल डिस्टंसिंग पाळणे, वारंवार हात धुणे, गर्दी टाळणे, माक्स वापरणे याकडे विशेष लक्ष द्यावे.
डॉक्टर विशाल मगर
तालुका वैद्यकीय अधिकारी.