देऊळगाव माळी रवींद्र सुरुशे. -महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय देऊळगाव माळी च्या विद्यार्थ्यांनी शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या एन एम एम एस परीक्षेमध्ये आपल्या परंपरेला साजेशे यश मिळवत तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात आपला लौकिक कायम राखला आहे.
विद्यालयातून परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी 11 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. त्यापैकी चार विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले असून त्यांना वर्ग नववी ते बारावीपर्यंत सलग चार वर्ष दरमहा एक हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यावर त्यांचा शैक्षणिक खर्च भागणार असून त्यांच्या गुणवत्तेला आणखी वाव मिळणार आहे. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यां मध्ये तुषार गजानन मगर, तुषार ज्ञानदेव भराड, कुमारी सानिका दत्ता भराड, व कुमारी गायत्री जयराम अंभोरे , या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या सर्व पात्र व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक वृंदा चे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अनिल कुमार गाभणे, उपाध्यक्ष दि.स.अंभोरे, सचिव किशोर गाभणे, संस्थेचे सर्व संचालक मंडळ, प्राचार्य विश्वनाथ बाहेकर, पर्यवेक्षक एम. व्ही.गाभणे, सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षक वृंद यांनी कौतुक केले आहे.