एस टी च्या संप मुळे ग्रामीण विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान . विद्यार्थ्यांचा दुचाकीवर वाहतुक नियम तोडून जीवघेणा प्रवास
गजानन सोनटक्के जळगाव जा – महाराष्ट्भर सध्या राज्य परिवहन महामंडळ चा संप सुरु असुन त्यातच 1ली ते 4थी शाळा सुरु झाल्याने
ग्रामीण भागातील10वी व 12च्या विद्यार्थ्या सह सर्व विदयार्थ्यना तालुक्याला व शिक्षणस्थळी पोचण्यासाठी कष्ट पडत आहेत. उसरा येथून जळगाव जामोद येथे एकच दुचाकीवर तब्बल 6 जन जात असताना त्यांच्याशी बोलले असता त्यापैकी 2 विद्यार्थी हे 12वी वर्ग चे skk कॉलेजचे तर 2विद्यार्थी हे 10व्या वर्ग चे न्यू इरा शाळेचे व इतर 8वी चे होते.
![](https://www.matrutirthalive.com/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Image-2021-12-07-at-13.45.02-768x1024.jpeg)
त्यांच्या माहितीनुसार दररोज त्याना उसरा ते जळगाव जामोद हा 12कीमि व परतीचा प्रवास 6जन मिळून करतात.असे तालुका व जिल्हाभरात कित्येक विद्यार्थी करत आहेत. एकिकडे मागिल 2सत्रापासुन कोरोना साथी मुळे शिक्षणाचे तिन तेरा झालेले असताना सोबतीला हा एस टी संप ग्रामीण विद्यार्थी चा शैक्षणीक प्रगतीला बाधा आणणारा ठरत आहे.असे वाहतुक नियम मोडून प्रवास करणारे विद्यार्थी जेव्हा पोलिस समक्ष येताच दंडाच्या भितीने वाहन अणखी धोकादायक पद्धतिने पळवु किवा वळवू शकतात.अशावेळी दुर्घटना घडू शकते,एकंदरीत ग्रामीण विद्यार्थ्यांचे व पालकांचे कोरोनाणे व एस टी संपाणे चांगलेच हाल केले दीसत आहे.आता सर्वाना प्रतिक्षा आहे ती एस टी पूर्ववत सुरु होण्यची व कोरोनासह अमिक्रोन व्हेरियेंट परत जाण्याची.