जळगाव जा गजानन सोनटक्के : गेल्या १० वर्षांपासून सतत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक पणे लढणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जळगाव मतदार संघात शेतकरी, शेतमजूर व तरुणांचं मजबुत संघटन केल्याच आंदोलनाच्या माध्यमातून दिसत आहे. त्याच बरोबर २०२० चा सोयाबीन पिक विमा प्रश्न चांगल्या प्रकारे हाताळत शेतकऱ्यांना पिक विमा मिळवून देण्यासाठी स्वाभिमानीने १० महिन्यापासून आंदोलनाचा लढा उभारून मतदार संघाला ६४ कोटी रुपये पिक विमा मंजूर करून घेतला. आणि विमा रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होई पर्यंत लढणार असल्याचा विश्वास शेतकऱ्यांनी दर्शविल्याचे पाहुन स्वाभिमानी चे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात जामोद येथिल शेकडो युवकांनी दि.१७ संप्टेबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत जाहीर प्रवेश करून घेतला आहे.
आम्हाला व आमच्या माय बाप शेतकऱ्यांना स्वाभिमानाने जगता याव याकरीता शेतकरी चळवळीला अधिक बळ यावं करीता आज आम्ही संघटनेत प्रवेश करत आहो अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. शेतकरी कष्टकरी जणसामान्य माणसाचे स्वप्न साकार करण्यासाठी मा.खा.राजु शेट्टी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गाव तिथे शाखा, व घर तिथे स्वाभिमानी करण्यासाठी कामाला लागा मतदार संघात १५ वर्षांपासून बोकाळलेल्या भ्रष्टाचाराची जाळं मुळ उखळुन फेका. शेतकरी व शेतमजूर यांच्या प्रश्नावर तुटून पडा असे आवाहन या वेळी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी पक्ष प्रवेश सोहळ्यात बोलतांना केले. यावेळी तेजराव लोणे, स्वप्निल भगत, महादेव काळपांडे, अनिल धर्मे,अनिल भगत, समाधान धुर्डे,गजानन राऊत,शुभम कपले,प्रविण कपले यांच्या प्रमुख उपस्थित प्रशांत डिक्कर यांचे हस्ते बिल्ला लावून सर्व युवकांनी प्रवेश करून घेतला .
यामधे प्रामुख्याने हरिभाऊ हागे, दिनकर कपले, मुरली भाऊ भगत, मोहन भाऊ राऊत, संदीप भाऊ जाधव,शिवाजी इंगळे, संतोष दलाल, अनिल धुर्डे, पांडुरंग धुर्डे, जितेंद्र येडे,देवानंद जाधव, भारत चव्हाण, शेख शाहिद शेख मजीद, सागर चव्हाण, सुनील दामधर, विजू भगत, सुनील भाऊ रौंदळे, रमेश पाटील, कडू भाऊ ठाकूर ,, गजानन धर्मे, मंगेश लोणे, शुभम हांडे, विनोद ताडे, गणेश बढे, दादू मोरे, संजूभाऊ धर्मे,जितू मोरे, बजरंग मोरे, अजित चोहान, किसना वास्कले, वॉलसिंग बारेला ,दिनेश अहिरे, रमेश राऊत,राजू राऊत, जामसिंग मुजलदा, संतोष काळपांडे, नितेश जाधव, गणेश चव्हाण, अविनाश जाधव, शुभम भड, शैलेंद्र शिंदे, दिनेश भाऊ, गोपाल बोडखे, गजानन दलाल, वैभव किसन धूर्डे, आकाश बोरसे,आकाश ठाकरे, ज्ञानेश्वर लोंणे , कमलेश बारेला, सुभाष अलावा, अनंता पुंजाजी दलाल, गणेश लोणाग्रे, संजू दलाल, सागर दळवी, बाबुभाई मिस्त्री, शेख रशीद , संतोष गव्हाळे, सागर बोरसे,मुकेश वानखडे, सखाराम हिस्सल,संतोष गवई, ज्योतीराम अलावा, वैभव रामदास भगत, आशिष भास्कर कपले, सुशील रामदास दलाल, बळीराम मोरे,निलेश हांडे,सागर दलाल, उमेश लोंने, सुभाष वानखेडे, अजय आदिवासी,वसंता निमकर्डे, सोनाजी उगले,रघुभाऊ हागे, राहुल दलाल यांच्या सह बहुसंख्य युवकांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश घेतला आहे.