शेतकऱ्यांच्या पेरण्या उलटल्या.तालुक्यावर दुबार पेरणीचे संकट. शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या–रमेश बाणाईत..
गजानन सोनटक्के जळगाव(जामोद)ता.प्रतिनिधी :- गेल्या वर्षात सोयाबीन पीक मातीमोल झाले, कपाशीचे पीक गुलाबी बोंड अळी मुळे नष्ट झाले ,कोणतेही पीक शेतकऱ्याचे घरात गतवर्षी आले नाही. शासनाने कसलीही आर्थिक मदत दिली नाही. पिक विमा कंपन्यांनी पीक विम्याचे पैसे अद्यापपर्यंत दिले नाहीत,कोणत्याही राजकीय मंडळींनी शेतकऱ्यांसाठी काहीही साहाय्य केले नाही.शासनास ज्याने त्याने शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसली ,ह्या वर्षी सुद्धा पहिल्या दमदार पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या.नंतर पावसाने कायमची दांडी मारली आणि तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पेरन्या उलटल्या. दुबार पेरणीचे संकट शेतकर्यांसमोर उभे राहिले आहे. पुढील पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे कसलीही आर्थिक तरतूद नाही. बँका शेतकर्यांना उभे करायला तयार नाहीत. अशा परिस्थितीत शासनाने दुबार पेरणीसाठी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आर्थिक सहकार्य करावे ,अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश बानाई यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे दिनांक २४ जून रोजी केली आहे.
शासनाच्या फसव्या हवामान अंदाजानुसार परिसरातील शेतकऱ्यांनी कोरडवाहू शेतीच्या पेरण्या आटोपल्या. ह्यावर्षी सोयाबीन बियान्याचा भयंकर तुटवडा होता, तरीही उधार ,पाधार व्याजाने पैसे घेऊन शेतकऱ्यांनी मिळेल तेथून सोयाबीन बियाणे उपलब्ध केले. कित्येक शेतकऱ्यांनी तर पर जिल्ह्यातून ,परराज्यातून बियाणे उपलब्ध करून सोयाबीन पेरणी केली. मका व कपाशी बियाण्याची सुद्धा महाग भावाने उचल करून आपापल्या शेतांमध्ये शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. शासनाने शेतकऱ्याला पेरणीसाठी कसलेही साहाय्य केले नाही. छत्रपती शिवाजी महाराजशेतकरी सन्मान योजना तसेच महा विकास आघाडी शासनाच्या महात्मा फुले कर्ज मुक्ती योजनेचा सुद्धा शेतकऱ्यांना फायदा मिळाला नाही. यापूर्वीच कर्ज असल्यामुळे बँकांनी नव्याने पीक कर्ज देण्यास टाळाटाळ केली ,म्हणून व्याज बट्ट्याने पैशाची व्यवस्था करून कित्येक शेतकऱ्यांनी शेतीची पेरणी केली आणि अशा परिस्थितीत पावसाने दगा दिला. त्यामुळे शेतकऱ्यांवर गंभीर संकट ओढवले आहे. तरी शेतकऱ्यांना शासनाने कृषी विभागामार्फत सर्वेक्षण करून तात्काळ आर्थिक मदत द्यावी. जेणेकरून त्याला दुबार पेरणी साठी अडचण जाणार नाही, असेही रघुनाथदादा प्रणीत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश बानाईत त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच महाराष्ट्र शासनाच्या ऑनलाईन वेबसाईट वर त्यांनी आपले निवेदन रवाना केले आहे.