जळगांव जा.प्रतिनिधी गजानन सोनटक्के : दिनांक 23 जून रोजी शिवसेना नगरसेवक रमेश ताडे व सहकाऱ्यांनी जळगाव शहरातील नगरपरिषद क्षेत्रातील महसूल कॉलनी येथील उद्यानाला श्री संत रुपलाल महाराज उद्यान असे नाव तर सेवकदास नगर येथील उद्यानाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असे नामकरण करावे अशा आशयाचे निवेदन मुख्याधिकारी व नगराध्यक्ष गैरहजर असल्यामुळे त्यांच्या दालनाला चिटकविण्यात आले होते. तसेच शिक्षण सभापती नगरसेवक रमेश ताडे यांनी निवेदनाद्वारे नगरपरिषदेला तीन दिवसाचा अल्टिमेटम दिला होता.
नाहीतर शिक्षण सभापती नगरसेवक रमेश ताडे हे स्वखर्चाने या दोन्ही उद्यानाचे नामकरण करणार होते. नगरपरिषदेने त्यांचा धसका घेत त्यानुसार आज तिसऱ्या दिवशी म्हणजेच 25 तारखेलाच शिक्षण सभापती नगरसेवक यांच्या निवेदनाचा धसका घेत अखेर आज दिनांक 25 जून रोजी स्थानीक महसूल कॉलनी येथील उद्यानाला श्री संत रुपलाल महाराज उद्यान असे नामकरण करण्यात आले. यावेळी सर्व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महसूल कॉलनी उद्यानाचे नामकरण केल्याबद्दल श्री संत रुपलाल महाराज यांच्या बोर्डाला हारअर्पण केला. यावेळी आनंद उत्सव साजरा करताना शिवसेना तालुकाप्रमुख तथा नगरसेवक गजानन वाघ, शिक्षण सभापती नगरसेवक रमेश ताडे, संजय भुजबळ ,संदिप मानकर ,युवासेना शहरप्रमुख विशाल पाटील,उपशहर प्रमुख मंगेश कतोरे ,संकेत राहाटे,युवराज देशमुख ,रामकृष्ण वंडाळे,पवण वाघ,गोपाळ ढगे,सोमेश लाढ,अमोल हागे,भागवत हागे ,अनिल म्हस्के,इत्यादी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.