उपजिल्हा रुग्णालय करण्याची जिल्हाधिकार्यांकडे मागणी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांची सिंदखेड राजा हॉस्पिटलला व ग्रामीण रुग्णालयाला भेट
सिंदखेड राजा शहर प्रतिनिधी – सिंदखेड राजा येथे नवीन सुरू झालेल्या समर्पीत कोविड हॉस्पिटलला व शहरातील ग्रामीण रुग्णालयात देखील भेट देऊन जिल्हाधिकारी एस रामा मूर्ती यांनी भेट दिली व पाहणी केली .
बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी सिंदखेड राजा येथे अचानक येऊन शहरातील नवीन सुरू करण्यात आलेले अत्याधुनिक हॉस्पिटलची पाहणी करून सविस्तर माहिती घेतली तसेच उपजिल्हाधिकारी यांनी सिंदखेड राजा येथील ग्रामीण रुग्णालयाची प्रत्येक पाहणी करून ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ सुनीता बिराजदार यांना ग्रामीण रुग्णालय बाबत सूचना केल्या . या सोबतच ग्रामीण भागात सुरू असलेल्या लसीकरणाची माहिती घेऊन त्या विषयी देखील चौकशी केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष डॉक्टर राजेंद्र अंभोरे यांनी लसीकरण बाबत योग्य नियोजन करण्यासाठी व सिंदखेड राजा ग्रामीण रुग्णालयाला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी देखील केली . यावेळी नगराध्यक्ष सतीश तायडे , उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी , तहसीलदार सुनील सावंत , नगर परिषद मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ सुनिता बिराजदार , गट विकास अधिकारी देव गुनावत ,नायब तहसीलदार प्रवीण लटके , ग्रामीण रुग्णालयाच्या वरिष्ठ परिचारिका वर्षा राठोड, नगरसेवक बालाजी मेहेत्रे , काँग्रेस शहराध्यक्ष सिद्धार्थ जाधव ,राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते संजय मेहेत्रे यांच्यासह महसूल आरोग्य विभागाचे व नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी याठिकाणी उपस्थित होते