Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांना धमकी देणाऱ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मा गृहमंत्रीना निवेदन
मार्फत उपविभागीय अधिकारीसाहेब उपविभागीय

गजानन सोनटक्केजळगांव जामोद

जळगांव :अमरावती शहरासह विभागात गुटखा माफियांविरुद्ध च्या बातम्या दै. जनमाध्यम च्या अकोला प्रतिनीधीकडून चालविण्यात आल्या. गुटखा माफियांविरुद्ध जनमाध्यम ने दिलेल्या वृत्ता मुळे अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक सी. के. मीना यांनी दैनिक जनमाध्यम से सहसंपादक यांना खोटा गुन्ह्यांमध्ये अडकवून सहा महिने तुरुंगात सडविण्याची धमकी दिली असल्याचे जनमाध्यमने प्रसारित केलेले वृत्त वाचले, सोबतच जनमाध्यमचे वृत्त संचालक अभिराम देशपांडे यांना अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी व्हाट्सअप मेसेज पाठवून पोलिसांची प्रतिमा डागाळत असल्याबद्दल एफ. आय. आर. दाखल करण्याची धमकी दिली अमरावतीच्या इतिहासात वृत्तपत्र संपादकांना वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून अशा धमक्या देण्याचा प्रकार यापूर्वी घडल्याचे ऐकीवात नाही. वृत्तपत्र सृष्टीमध्ये व दृकश्राव्य माध्यमांमध्ये वृत्त प्रसारित करणे हे वृत्तपत्रसृष्टीचे व दृकथाव्य माध्यमांचे खरे कर्तव्य आहे. महानिरीक्षक सी. के. मीना आणि अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या धमक्यांना न घाबरता जनमाध्यमने वृत्तमालिका चालविलेली आहे, तीच खऱ्या अर्थाने निर्भीड पत्रकारिता आहे. पत्रकारिता क्षेत्रामध्ये दिग्गज असणाऱ्या ज्येष्ठ व श्रेष्ठ अशा “पत्रकारितेला’ खऱ्या अर्थाने “परमोधर्म मानणाऱ्या पत्रकारांना पोलिसांकडून धमक्या येणे व लोक वि
खोट्या गुन्ह्यांमध्ये अडविण्याच्या धमक्या देणे हे अमरावती पोलिसांसाठी निंदणीय बाब आहे, या धमक्यां देऊन वृत्तपत्रांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या अधिकाऱ्यांचा अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो व वेळ पडल्यास पत्रकारिता क्षेत्राकरिता आंदोलनात्मक भूमिका घ्यावयाची झाल्यास अ. भा. ग्रामीण पत्रकार संघ जनमाध्यम सोबत असेल.
आपल्या पुरोगामी महाराष्ट्रातअशा पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्रकारावरील वाढत्या दडपशाहीठी चिंता वाटते ती तरुण आणि निर्भीड उमद्या पत्रकारांची. उद्या पोलीस अधिकाऱ्यांनी असाच पायंडा पाडला तर हे नवीन व उत्साही तरुण आणि निर्भीड पत्रकार कसे काय निर्भीडपणे पत्रकारिता करू शकतील? त्यांच्या पाठीशी त्यांच्या वृत्तपत्राचे व्यवस्थापन किंवा संपादक इतक्याच ठामपणे उभ्या राहतील काय? असा प्रश्न उपस्थित होतो. अशा उर्मट व पदाचा पत्रकारा विरोधात गैरवापर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर वेळीच पायबंद घालून जनमाध्यम धमकी प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी. व पत्रकारांना सुरक्षा प्रदान करावी हि कळकळीची विनंती. या निवेदनावर तालुकाध्यक्ष गणेश भड,राजेश बाठे, जिल्हा उपाध्यक्ष अश्विन राजपूत,तालुका संघटक अमर तायडे, जिल्हा संपर्कप्रमुख मनीष ताडे, तालुका सचिव अनिल भगत,तालुका संपर्क प्रमुख अमोल भगत, संतोष कुलथे, गोपाल अवचार,इ च्या सह्या आहे

Leave A Reply

Your email address will not be published.