- ज्येष्ठ नागरिकांना एकाच ठिकाणी मिळणार सुविधा
बुलडाणा,दि.2 : सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय,बुलडाणा अंतर्गत ज्येष्ठ नागरिक धोरण, योजना राबविण्यात येते. त्या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांना कार्यालयात एकाच ठिकाणी सर्व सोयी, सुविधा उपलब्ध होवून त्यांच्या प्रश्नांचे निराकारण होण्याच्या दृष्टीने ज्येष्ठ नागरिक कक्ष समाज कल्याण कार्यालयात स्थापन करण्यात आलेला आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या तात्काळ नोंदीकृत करणे, समस्येबाबत तात्काळ निराकारण करून योग्य ते मार्गदर्शन देणे हा कक्ष स्थापन करण्यामागील हेतू आहे. ज्येष्ठ नागरिक कक्षात उपस्थित नागरिकांच्या नोंदी तथा योग्य तीमाहिती पुरविण्याकामी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालया अंतर्गत एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तरी ज्येष्ठ नागरिकांनी या कक्षाची मदत घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ अनिता राठोड यांनी केले आहे