Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

देवराई 2021 हा सूनगाव वनसैनिकांचा स्तुत्य उपक्रम

गजानन सोनटक्के जळगाव जामोद दि 26 – तालुक्यातील सूनगाव येथील नवतरुणांनी एकत्र येत पर्यावरणपूरक असा देवराई 20 1001 झाडे लोकसहभागातूनसूनगाव येथे 2016 पासूनच पाणी फाउंडेशन च्या स्पर्धेनंतर गावात एक पर्यावरणप्रेमाची लाट तयार होऊन जल,जमीन,जंगल याविषयी नागरिक दक्ष झाले.2018 व 2019 ला जलसंधारणाचे यशस्वी कामे केल्यानंतर आता,यावर्षी लोकसहभागातून व श्रमदानातून 1001 वृक्षलागवड व संगोपन करण्याचा संकल्प गावातील नवतरुणांनी वनसैनिक बनत केला आहे.गावाजवळील गोरक्षनाथ महाराज मंदिर जवळील गोवर्धन टेकडी पायथ्याशी ओसाड जागेवर शेमदानातून खड्डे खोदून या खड्ड्यामध्ये काही अधिकारी मंडळींच्या सौजन्याने मिळणारी भारतीय स्थानिक वृक्षरोपे लावण्यात येणार आहेत.दि 1 जुलै ते 19 जुलै हा लागवडकार्यक्रम चालेल, यासाठी श्रमदान करण्यास उत्सुकना सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे

jamod

.यावेळी तरुणांनी तयार केलेले खड्डे पाहून अधिकारी व उपस्थित समाधानी झाले व मुलांच्या मेहनतीचे कौतुक केले, याप्रसंगी सूनगाव ग्रामपंचायत सरपंच रामा अंबडकर , अरुण घुईकर. वनरक्षक पर्यावरण प्रेमी अश्विन राजपूत पत्रकार गजानन सोनटक्के पत्रकार गणेश भड अनिल वाघ प्रशांत राऊत कान्हा धुर्डे, निवृत्ती वंडाले,गजानन वंडाले,आशिष भगत,गणेश फुसे,वैभव गव्हाळे ,संतोष कतोरे, सर्व वनसैनिक, ,व बरेच वणप्रेमी उपस्थित होते.या उपक्रमात कोणीच कुणाला एक रुपयाही मागत किंवा देत नसून सर्व जबाबदाऱ्या पर्यावरणप्रेमी वनसैनिकांनी वाटून घेत उपक्रम पार पाडण्याचे ठरवले आहे, या उपक्रमात विठल कपले, महादेवराव धुर्डे मा. उपसभापती न प ज जा, गोरक्षनाथ महाराज मंदिर,सातपुडा बचाव समिती,सामाजिक वनीकरण टीम,वनविभाग टीम,ग्रामपंचायत सूनगाव ,व तालुक्यातील पर्यावरणप्रेमी वनसैनिकांचे सहकार्य लाभत आहे.0 खर्चात हा आगळावेगळा उपक्रम सर्वांचे लक्ष वेधत असून तालुक्यात या उपक्रमाची सकारात्मक चर्चा होत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.