किनगाव राजा प्रतिनिधी (सचिन मांटे ) – दिल्ली सीमेवर होत असलेल्या शेतकरी आंदोलनास राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी किनगाव राजा आणि महाविकासआघाडी यांचा पाठिंबा याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट साहेब तालुकाध्यक्ष शिवाजी राजे जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली येथे होत असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्याबाबत व केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या शेतकरी विरोधी कायद्याचा जाहीर निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा देत आहोत असे जाहीर करून पोलीस स्टेशन किनगाव राजा येथे निवेदन दिले आहे .
या निवेदनावर राजे विजयसिंह राजे जाधव (तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य) सचिन मांटे (राष्ट्रवादी कामगार सेलचे तालुकाध्यक्ष) हकीम पठाण( अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष) गणेश काकड( विद्यार्थी युवक उपाध्यक्ष) आनंद राजे जाधव यांच्या सह्या आहेत