गजानन सोनटक्के जळगाव जा जळगांव जा.तालुका प्रतिनिधी :- जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील विठ्ठल मंदिर परिसरात राहणाऱ्या किसन नारायण धर्मे वय 35 वर्ष या तरुणाची स्वतःच्या घरातच छताच्या लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना दिनांक 8 जून रोजी सकाळी घडली आहे. सदर घटनेची फिर्याद मृतकाचा भाऊ समाधान नारायण धर्मे यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली की माझा भाऊ मृतक किसन नारायण धर्मे याचे लग्न सन 2014 मध्ये झाले होते परंतु काही कारणास्तव त्यांची फारकत झाल्यामुळे तेव्हापासून त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते त्यामुळे तो मनोरुग्ण सारखा वागत असल्याने त्याचा इलाज अकोला येथील डॉक्टर सुजय पाटील यांच्याकडे सुरू होता वडील व मी घरी नसताना माझा भाऊ मृतक किसन नारायण धर्मे यांनी घरातिल लोखंडी अँगलला शिडी च्या साहाय्याने दोरखंड बांधून गळफास घेत आत्महत्या केली आहे अशी फिर्याद जळगाव जामोद पोलीस ठाण्यात देण्यात आली. फिर्यादीने घटनेची तक्रार नोंदवताच जळगाव जामोद पोलीस स्टेशन चे शेषराव पाटील तसेच होमगार्ड संजय बुंदेले सह घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्याकरिता जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आला. शवविच्छेदनानंतर त्याच्यावर सुनगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनात हेड कॉन्स्टेबल अशोक वावगे हे करीत आहेत.
Related Posts