
सिंदखेड राजा प्रतिनिधी दि १४ -करोना च्या दुसऱ्या लाटेतील निर्बंध शिथिल करण्यात आले मात्र अजूनही आठवडी बाजार वरील निर्बंध कायम आहे . असे असतांना सिंदखेड राजा येथे सोमवार हा आठवडी बाजार चा दिवस आणि निर्बंध असल्यामुळे रामेश्वर मंदिर परिसरातील नेहमीचा आठवडी बाजार अजूनही बंद आहे पण आज दिनांक १४ जुन रोजी जिजाऊ जन्मस्थान समोर आठवडी बाजार हा जागा बदलून भरला कि काय असे चित्र होते गर्दी अशी कि त्या गर्दीत एकजरी करोना POSITIVE असेल तर सिंदखेड राजा शहर आणि परिसरात येणाऱ्या दिवसात रुग्ण संख्या वाढल्यास जवाबदार कोण ? ना सोशल डिस्टंसिन्ग , ना तोंडाला मास्क प्रशासनासोबतच नागरिकांनीही आपली जवाबदारी ओळखून वर्तवणूक करावी कमी झालेली रुग्णसंख्या व शिथिल निर्बंध याचा फायदा अत्यावश्यक खरेदी साठी व्हावा पण इथे मात्र सर्व नियमांची पायमल्ली होतानाचे चित्र आहे . करोना कमी झाला संपला नाही हि बाब लक्ष्यात घेण्याजोगी आहे .