Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

ग्रामीण रुग्णालय सिंदखेडराजा येथे सिकलसेल आजार नियंत्रण व जागरूकता सप्ताह भिमराव चाटे प्रतिनिधी

ग्रामीण रुग्णालय सिंदखेडराजा येथे सिकलसेल आजार नियंत्रण व जागरूकता सप्ताह भिमराव चाटे प्रतिनिधी
11- 17 डिसेंबर 2022 सिकल सेल आजार नियंत्रण जन जागृती सप्ताह साजरा करण्यात आला यावेळी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय सिंदखेडराजा व ग्रामीण रुग्णालय सिंदखेडराजा यांच्या संयुक्त विद्यमानाने साजरा करण्यात आला वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुनिता बिराजदार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्रकुमार साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये नवीन विवाहित या सोयरीकपूर्व युवक युतींनी लग्न अगोदर सिकलसेल ची तपासणी करून घ्यावी हेच या आजार नियंत्रणात आणण्याचा सर्वोत्तम उपाय आहे
सिकलसेल जाणूया सिकलसेल टाळूया हे आपण सर्वांना साध्य करायचे आहे या आजारांच्या रुग्णांमध्ये रुग्णांना वारंवार थकवा येणे ताप येणे रक्ताची कमी अशक्तपणा सांधेदुखी जंतुसंसर्ग होणे पोटाच्या डाव्या बाजूला दुखणे निस्तेज चेहरा अशी लक्षणे दिसून येतात त्यामुळे असा आजार पुढील पिढीमध्ये येऊ नये यासाठी प्रत्येक युवकांना व युवतींना लग्नापूर्वी तपासणी करून घ्यावी ही तपासणी शासकीय रुग्णालयात विनामूल्य केली जाते याबाबत अधिक माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा शासकीय रुग्णालय वैद्यकीय अधिकारी / सिकलसेल समुपदेशक यांच्याशी संपर्क करावा या कार्यक्रमाचे संचालन प्र.शा.तं श्रीमती वर्षा डोंगरदिवे आभार प्रदर्शन श्री प्रवीण शिंदे तालुका सिकलसेल सहाय्यक यांनी केले तर कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत वैद्यकीय अधिक्षक डॉ.सुनिता बिराजदार ,डॉ. महेंद्रकुमार साळवे ता.आ.अ. ,श्री.दिलीप मेहेत्रे,अर्चना चाटे ,श्री शेळके, औ.नि.अ ,वै.अ.डॉ. गाणार ,वै.अ डॉ विनोद शिंगणे,श्री मवाळ,श्री खरात श्री लक्ष्मण राठोड प्र.शा.तं.श्री नारायण सुनवसे , इतर आरोग्य कर्मचारी जनजागृती कार्यक्रमास उपस्थित होते.

Sindkhed raja
Leave A Reply

Your email address will not be published.