गीताई ह्युमनकाईंड डेव्हलपमेंट ट्रस्ट, पुणे द्वारा संचालित, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला सलग्नित, कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषि महाविद्यालय, आमखेडा ता. मालेगाव जि. वाशीम येथील सातव्या सत्राच्या विद्यार्थांनी कृषि जागृकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम २०२१-२२ अंतर्गत कोरोना नियमाचे पालन करून कृषीदुत सौरभ संजय या विद्यार्थ्यांने सिंदखेड राजा तालुक्यातील निमगाव वायाळ येथे
शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जाऊन विविध शेतीविषयक अँप्स ची माहिती दिली .यावेळी त्याने शेतकऱ्यांना किसान सुविधा अँप, हवामान बदलाचा अंदाज घेऊन शेतीतील काम करावे का नाही पाऊस व हवामान कसे असेल याचा साठी पण अँप चा वापर कसा होतो, तसेच शासनाच्या शेतीविषयक योजनाची माहिती मिळवण्यासाठी अँप चा कसा उपयोग होतो हे समजावून सांगितले.तसेच चालू भाव जाणून घेण्यासाठी बीजक(bijak)अँप अश्या विविध अँपस बद्दल माहिती चार्ट चा वापर करून माहीती सांगितली व अश्या अँप चा वापर करण्याचा सल्ला दिला. यावेळी शेतकरी नरहरी निलख, गणेश भानुसे, गजानन पिसे, गजानन वायाळ, संजय नाईक, सतीश वायाळ इत्यादी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.एच.वसू , प्रा.प्रदीप निचळ, कार्यक्रम समन्वयक व विषयतज्ञ प्रा. समाधान कव्हर, कार्यक्रम अधिकारी प्रा.शशिकांत वाकुडकर व इतर प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन लाभले