सिंदखेड राजा – महाराष्ट्राची अस्मिता राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असणारे मातृतिर्थ सिंदखेड राजा नगरीमध्ये पुतळा बारव म्हणून जगप्रसिद्ध वास्तू आहे भारतातील वन्य प्राणी हत्ती घोडे उंट नंदीबैल वाघ-सिंह यासारखे असंख्य प्राणी तसेच शेकडो देव-देवतांच्या अत्यंत कोरीव सुबक व सुंदर मूर्ती या वास्तूमध्ये पाहायला मिळतात परंतु काळाच्या ओघात मध्ये परकीय व स्वकीय शत्रूं यांनी आक्रमण करून अनेक मूर्ती यांची धारदार शस्त्र मुर्त्यांचे नाक कान हात पाय व इतर अवयव कापून त्यांना अपवित्र बनविण्याचा प्रयत्न केला कदाचित महाराष्ट्र मध्ये एवढ्या मोठ्या एकत्र मुर्त्या असलेली ही एकमेव वास्तू आहे तारीख 30 जून रोजी राजे लखुजी जाधव यांचे वंशज शिवाजी राजे जाधव व निस्सीम जिजाऊ भक्त एडवोकेट संदीप मेहत्रे यांनी या ऐतिहासिक पुतळा बारव याची पाहणी करून पुरातत्व खात्याच्या निष्क्रिय व दुर्लक्षित धोरणामुळे हा ऐतिहासिक ठेवा धरो धर जतन व संवर्धन करण्याची गरज असल्याची मागणी राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे व खासदार प्रतापराव जाधव यांनी हा विषयाकडे गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे.
सिंदखेड राजा येथील निस्सीम जिजाऊ भक्त एडवोकेट संदीप मेहेत्रे यांनी सांगितले की केंद्र व राज्य पुरातत्त्व विभाग यांनी दुर्लक्ष केल्यामुळे हा ऐतिहासिक वारसा धोक्यात आला आता त्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी केलीमातृतिर्थ सिंदखेड राजा या शहरातील जगप्रसिद्ध पुतळा बारव याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे महाराष्ट्रातील जिजाऊ भक्त इतिहासकार संशोधक सामाजिक कार्यकर्ते पत्रकार तसेच मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे तसेच खासदार प्रतापराव जाधव यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे जेणेकरून केंद्र व राज्य पुरातत्व विभाग याकडे लक्ष द्यावी अशी मागणी जनमानसातून होत आहे.