सिंदखेड राजा प्रतिनिधी – सौ नंदाताई विष्णू मेहेत्रे उपनगराध्यक्ष सिंदखेड राजा यांच्या विरोधात 31 मे रोज सोमवारला नगरपालिकेत 15 नगरसेवकाच्या सह्याने नगरपरिषद अध्यक्षाकडे अविश्वास प्रस्ताव दाखल झाला होता. या संदर्भात राजीनामा देत असतांना सौ नंदाताई विष्णू मेहेत्रे उपनगराध्यक्ष यांनी काही मुद्दे सर्वांसमोर ठेवले 31 मे रोज सोमवारला नगरपालिकेत 15 नगरसेवकाच्या सह्याने नगरपरिषद अध्यक्षाकडे अविश्वास प्रस्ताव दाखल झाला होता या सर्वांनी माझ्यावर खोटेनाटे आरोप लावून अविश्वास प्रस्ताव का दाखल केला त्याचि कारणे दिली त्याबद्दल मी काही खुलासा करू इच्छिते .
मी मातृतीर्थ सिंदखेड राजा शहराची मागील पंचवार्षिक मध्ये दोन वर्ष नगराध्यक्ष व ह्या पंचवार्षिक मध्ये सव्वादोन वर्ष उपनगराध्यक्ष राहिलेली आहे मागील निवडणुकीत नगर परिषद च्या शिवसेना व भाजपाची युती झाली नगराध्यक्ष पद शिवसेनेकडे व उपनगराध्यक्ष पद 5 वर्ष भाजपकडे असा फार्मूला ठरला होता परंतु नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महा विकास आघाडी झाली त्यामुळे काही स्वार्थी लोकांनी नगरपरिषद मध्ये महाविकास आघाडी करायचे ठरविले अशाप्रकारे शिवसेना महा विकास आघाडी करून विश्वास घात केला मी व माझे पती श्री विष्णू मेहेत्रे गेले पंधरा वर्षापासून प्रामाणिकपणे सतत जनतेच्या सेवेत प्रत्येक सुख-दुःखात सहभागी असतो तसेच आम्ही दोघांनी हि विविध पदे भूषविलेली आहेत जनता आपल्याला निवडून त्यांची सेवा करण्यासाठी देते मी नगराध्यक्ष असताना माझ्या कार्यकाळात शहरातील भरपूर विकासात्मक कामे झाली जनता याची साक्षीदार आहे विरोधकांनी जो माझ्यावर ठपका ठेवला मी विकास कामे होऊ देत नाही जर कुठल्याही पक्षाचे शासन असेल आपल्याला करोडो रुपये निधी देते परंतु विकास कामे बोगस असेल कामात भ्रष्टाचार होत असेल त्यात आपल्याला जरूर लक्ष घालावे लागते व असे कामे चांगल्या दर्जाची व्हावे अशा सूचना कराव्या लागतात किंवा लेखी पत्र द्यावे लागतात कारण आपण जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी असतो तसेच एकाच ठेकेदाराला करोडो रुपयांची कामे मॅनेज करून दिल्या जात होते हे मी निदर्शनात आणून दिले मी कधीही कुठल्याही निर्णय एक तर्फे घेतलेला नाही कारण उपनगराध्यक्षांना स्वतंत्र काहीही अधिकार नसतो जाणून बुजून मी विकास कामात काहीही अडथळा आणलेला नाही जर काही विकासात्मक कामे नियमबाह्य व संगनमताने होत असेल तेथे मी आशा कामांना चाप लावलेला आहे आज रोजी मी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून तरी नगरसेविका म्हणून राहणारच आहे आम्ही दोघेही पती-पत्नी अखंड जनतेच्या सेवेत कार्यरत राहणार आहे माझ्याकडे अपुरे संख्याबळ व भारतीय जनता पार्टीची एकमेव सदस्य असल्यामुळे मी विश्वास ठरावाला सामोरे न जाता उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत दिला आहे.