जैन संघटना व विविध राजकीय पक्ष यांचे ठाणेदारांना निवेदन
सिंदखेड राजा येथील युवतीला बहीण व भाऊ यांनी फुस लावून पळवून नेल्याची तक्रार युवतीची आई यांनी पोलीस स्टेशन सिंदखेड राजा येथे दिले आहे.
सदर निवेदन त्यांनी म्हटले आहे की माझ्या मुलीला महिलेने दिनांक २०/०७/२०२१ रोजीदुपारी फुस लावुन एका पांढऱ्या रंगाच्या गाडीत घेउन सोबत तिचा भाऊ व त्यांचे वडील , आई व आपला पती व अज्ञान ( नाव माहित नाही ) वाहन चालक यांना घेऊन आपल्याला दर्शना साठी जवयाचे आहे असे सांगुन सदर मुलीला गाडीत बसविले व पलायन केले. तसेच तिच्या जवळचा मोबाईल हिसकावुन घेऊन तो सतत पाच ते सहा दिवस बंद करुन ठेवला. दिनांक २१/०७/२०२१ त्यांना बऱ्याच वेळा मोबाईल केले वरिल पैकी आमचा मोबाईल उचलला नाही व पुणे येथे जाऊन आपला भाऊ सचिन नेमाडे ह्याचे सोबत तिचे जबरदस्तीने लग्न लावल्याचे समजते.
लग्न लावल्याचे फोटो मोबाईल वरुन व्हायरल केले यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे.युवक हा सुशिक्षीत बेकार असुन गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. त्याचे वय ३५ ते ३८ वर्ष असुन त्याचे कोठेही लग्न न जमल्या मुळे त्याचे लग्न व्हावे अशी तिचे व तिच्या आई वाडीलांची इच्छा होती. युवक याचेवर अनेक न्यायालयात गुन्हा दाखल आहे व तो आरोपीही आहे. त्यामुळे लग्न जमले नाही. म्हणुन महिलेने हा प्रयोग केला. सदर मुलीस जीवे मारण्याची धमकी देऊन तिला जबरदस्तीने लग्नास प्रवृत्त केले. सदर मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार सिंदखेड राजा पोलीस स्टेशन मध्ये २०/०७/२०२१ रोजी दाखल झालेली आहे. त्या बाबत अद्याप पोलीसांनी कुठल्याच प्रकारची कार्यवाही केली नसल्याचा आरोप केला आहे सदर मुलीची सुटका करुन आई वडीलांचे ताब्यत देण्या बाबतची विनंती मुलीच्या आईने २१/०७/२०२१ रोजी तिच्या जीवाला धोका असल्यामुळे केली आहे. या संपुर्ण प्रकारात मुख्य सुत्रधार महिला सहाय्यक अध्यापिका व तीचा भाऊ असल्याचे समजते. त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी मुलीची आई उज्वला अरविंद कुरकुटे यांनी केली आहे .
सिंदखेड राजा येथे जैन समाजाच्या वतीने व विविध राजकीय पक्ष पदाधिकारी यांनी तारीख 29 जुलै रोजी ठाणेदार जयवंत सातव यांना निवेदन देऊन तात्काळ मुलीचा शोध घेण्याची विनंती केली याप्रसंगी मुलीची आई उज्वला कुरकुटे तथा जैन संघटनेचे अध्यक्ष तथा पदाधिकारी भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडीचे जिल्हा सरचिटणीस विष्णू भाऊ मेहेत्रे समता परिषद तालुका अध्यक्ष एडवोकेट संदीप मेहेत्रे झी युवा नेते संजय मेहत्रे युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश शेठ खुरपे काँग्रेसचे शहर अध्यक्ष सिद्धार्थ जाधव नगरसेवक शेख अजीम राष्ट्रवादीचे युवा नेते संजय मेहेत्रे ,सामाजिक कार्यकर्ते संतोष बर्डे ,युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष शेख यासीन, रवी ढवळे ,शिव ठाकरे, नामदेव खांडेभराड, जैन संघटनेचे वसंत्राव वायकोस, मंगलदास दलाल ,अशोक वायकोस ,संजय वायकोस ,अजिंक्य कुरकुटे ,अरविंद कुरकुटे ,यांच्यासह आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.