कर्तव्यावर असताना सर्पदंशाने मृत्यू पावलेल्या सिंधी येथील स्व.गीता बुरुकुल यांच्या वारसाला आरोग्य कर्मचारी व पालक मंत्री यांच्याकडून मदतीचा हात.
सिंदखेडराजा रवींद्र सुरूशे – तालुक्यातील शिंदी येथील पी एल पदावर कार्यरत असताना विषारी सापाने चावा घेऊन ७ जून रोजी
उपचारादरम्यान मृत्यू पावलेल्या पीटीआय पदावर स्व. गीता बुरकुल यांच्या वारसाला मुलगा योगेशला सिंदखेडराजा तालुक्यातील
सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीने 27 जून रोजी आरोग्य कर्मचारी गोपाल मानकर यांच्या मुलीच्या लग्ना निमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते 95,500 रुपयांची आर्थिक मदत
गिताबाई यांचा मुलगा योगेशला देण्यात आली.