सिंदखेड राजा – सावखेड़ तेजन येथे वआगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी झाली शिवजयंती,शिवरायांचे आठवावे रूप,,शिवरायांचा आठवावा प्रताप आजकाल शिवजयंती म्हणजे,मिरवणूक डीजे, धींगाना, आणी त्यासोबत नशा पाणी सुद्धा,या पद्धतीने साजरी करण्याचे फैड तरुणांमध्ये पाहायला मिळते, परंतु या सर्व चंगळ वादी गोश्ठी बाजूला सारत सावखेड़ तेजन येथील तरुणांनी अगदी साध्या पद्धतीने शिवजयंती साजरी करत एक आदर्श आजच्या पीढ़ीपुढे ठेवला आहे.
शिवरायांचे नुसतेवअनुकरण न करता अनुसरण करा हा त्यामागचा उद्देश्य,”शिवचरित्र व आजचा तरुण” या विषयावर शिवरायांच्या विचारांचे पाईक असणारे डॉ किरण जायभाये सर यांनी परिपूर्ण असे मार्गदर्शन केलेत्यावेळी ते म्हणाले की शिस्त आणी सुनियोजित व्यवस्थापन याच्या बळावर शिवरायांनी स्वराज्य उभं केल.
त्याप्रकारे शिस्त युवकांनी आपल्या जीवनात बाळगावी,स्वतः च अस्तित्व निर्माण करावेत्याबरोबर एम पी एस सी परीक्षेत एन टी ड मधून प्रथम आलेला राहेरी खुर्द येथील श्री प्रदीपकुमार डोइफोड़े यांचा सावखेड़ तेजन वासियांच्या वतीने सत्कार आयोजित केलेला होता,जिद्द आणी चिकाटी जर तरुणांच्या अंगी असेल तर प्रतिकूल परस्थिति मध्ये सुद्धा यश संपादन करू शकता असे मत श्री डोइफोड़े यांनी व्यक्त केले .या कार्यक्रमसाठी युवकांनी खुप छान नियोजन केले.