पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नांतून जिल्ह्यात होणार आणखी 9 प्राथमिक आरोग्य केंद्र !आरोग्य विभागाने मागविला प्रस्ताव.
बुलडाणा – ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेच्या सोयी सुविधा लक्षात घेता जिल्ह्यातील अनेक ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र होणे गरजेचे आहे.हीच बाब लक्षात घेता जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी आरोग्य विभागाकडे पत्राद्वारे केलेल्या मागणीला यश आले असून सदर ठिकाणी आरोग्य केंद्रसाठी चा प्रस्ताव आरोग्य विभागाने मागविला आहे.
नव्याने प्रस्ताविक प्रा.आ. केंद्राचे नाव..
म्हसला बु· ता.बुलडाणा
जामठी ता.बुलडाणा
डोंगरशेवली ता.चिखली
सिनगाव जहांगिर ता.देऊळगावराजा
सोनाटी ता.मेहकर
ढोरपगाव ता.खामगाव
सुटाळा बु. ता.खामगाव
दाताळा ता.मलकापूर
देवधावा ता.मलकापूर